![]()
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, तीन भाऊ आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भोईटे यांनी ‘पुढारी’, ‘देशदूत’, ‘पुण्यनगरी’ आणि ‘देशोन्नती’ यांसारख्या विविध वृत्तपत्रांमध्ये दीर्घकाळ वार्तांकन केले. सध्या ते ‘दैनिक केसरी’मध्ये कार्यरत होते. पत्रकारितेसोबतच ते शेतकरी संघटनेचे नेते, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या शाळा मूल्यांकन तपासणी समितीचे सदस्य म्हणूनही सक्रिय होते. त्यांना संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान या दोन्हीसाठी उत्कृष्ट वार्तांकनाचे पारितोषिक मिळाले होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी राज्यभरात अनेक आंदोलने केली, ज्यात त्यांना कारावासही भोगावा लागला होता. ‘केसरी’चे विश्वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक आणि विश्वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक यांनी त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन संपन्न पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय लोकशाही दिनात दोन प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तक्रारदार उपस्थित होते. विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनात नव्याने दाखल दोन प्रकरणांचा समावेश होता. या अर्जदारांना तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबतच्या कागदपत्रांसह आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊन द्विवेदी यांनी सुनावणी घेतली.
Source link
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; पुणे श्रमिक पत्रकार संघाचे होते माजी अध्यक्ष