![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार रविवारी झाला. जि.प., पं.स. व पालिका निवडणुकीतील नाराजांमुळे या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून काही शिवसैनिकांना स्थानबद्ध करण्यात अाले होते. तसेच ३० पेक्षा अधिक शिवसैनिकांना कारवाईच्या नोटिसा देऊन कार्यक्रमाला न जाण्याची तंबी पोलिसांनी दिली होती. दरम्यान, विमानतळावर स्वागतासाठी गेलेल्या शिवसैनिकांनाही पोलिसांना अडवले.विमानतळावर उपमुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, त्यांचे पुत्र मल्हार पाटील व भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले; मात्र शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. यामुळेही विमानतळावर गोंधळ उडाला. इनसाइड स्टोरी – पालकमंत्र्यांना घातला होता शिवसैनिकांनी घेराव निवडणुका संपल्यानंतर पालकमंत्री सरनाईक धाराशिवला आल्यानंतर २०० वर संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजीसह घेराव घातला होता. शिवसैनिकांच्या आक्रमकतेमुळे पालकमंत्री सरनाईक यांनी स्वतःला कोंडून घेतले होते. असाच प्रकार शिंदेंसमोर घडण्याचा अंदाज होता.
Source link
धाराशिवला शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध; भाजप कार्यकर्त्यांनी केले स्वागत:गोंधळाच्या शक्यतेने शिवसैनिकांना रोखले, विमानतळावर राडा