![]()
पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व पर्यावरण शपथ
.
संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी ५० नारळ व ५० चिंचेची अशी एकूण १०० रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.
प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करावे तसेच स्वच्छ, हरित परिसर निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “मी स्वतः अस्वच्छता करणार नाही आणि इतरांनाही स्वच्छता राखण्यासाठी प्रेरित करेन,” अशी सामूहिक शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. पर्यावरण विषयाची शपथ कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिल गायकर यांनी दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे होते. यावेळी हसमुख पटेल, उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे, बापू शेळके, डॉ. प्रदीप सोनवणे, प्रा. उज्वल शेलार आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड व स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.