Headlines

‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष एक जीवन’ अभियानांतर्गत वृक्षारोपण:स्वयंसेवी संस्था, संघटनांसह वृक्षप्रेमी नागरिकांचा माेठा सहभाग‎




पर्यावरण संवर्धन, वसुंधरेला हिरवेगार बनवण्याच्या उद्देशाने ‘दिव्य मराठी’च्या वतीने मंगळवार ७ जुलैपासून ‘एक वृक्ष एक जीवन’ हे अभियान देशात राबवले जात आहे. या अंतर्गत शहरातील चैतन्य कॉलनी, राजापेठ पोलिस ठाणे, विजया स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये मंगळवारी ७ जुलैला वृक्षारोपण करुन अभियानाचा प्रारंभ केला. या वेळी पर्यावरण प्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘दिव्य मराठी’च्या या उपक्रमात महापालिकेसह विविध संस्थांची साथ मिळत आहे. आज पहिल्या टप्प्यात प्रातिनिधिक स्वरूपात शंभरहून अधिक रोपं लावण्यात आली. या वेळी शहरातील चैतन्य कॉलनीतील उद्यानात स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. याचवेळी राजापेठ पोलिस ठाणे परिसरात ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. या वेळी पीआय उमेश मुंडेंसह अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. साईनगरातील ‘विजया स्कूल फॉर एक्सलन्स’ स्कूलमधील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. दरम्यान आगामी काळात या व्यतिरिक्त अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय, शासकिय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘दिव्य मराठी’च्या आवाहनाला प्रतिसाद देवून व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. राजापेठ पोलिस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपणासाठी उपस्थित अधिकारी, अंमलदार.(दुसऱ्या छायाचित्रात) चैतन्य कॉलनी येथे वृक्षारोपण करताना महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर.(तिसऱ्या छायाचित्रात) साईनगरातील विजया स्कूल ऑफ एक्सलन्समधील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. ‘वृक्षारोपण ही केवळ सुरुवात आहे; खरे यश वृक्ष संवर्धनात आहे,’ असे प्रतिपादन पीआय संदीप चव्हाण यांनी केले. लावलेले प्रत्येक रोप जगवण्यासाठी नियमित पाणी, संरक्षण आणि योग्य देखभाल आवश्यक आहे. पर्यावरण संतुलित राखण्यासाठी, वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना हिरवाईचा अमूल्य वारसा देण्यासाठी वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून थांबून चालणार नाही, तर प्रत्येक रोपाचे संगोपन करून ते सशक्त वृक्ष बनवणे गरजेचे आहे. “एक झाड लावा आणि ते जगवा’ हा संकल्पच पर्यावरण संरक्षणाचा खरा पाया ठरेल, ‘दिव्य मराठी’ने हातात घेतलेले हे अभियान उत्तम आहे, असे राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *