Headlines

अमरावतीत प्रियकराचा अत्याचार; वडिलांची इज्जत‎ जाऊ नये म्हणून मुलीची आत्महत्या:प्रियकरासह त्याचा मित्र अन् मृतक तरुणीच्या दोन मैत्रिणींविरुद्ध गुन्हा दाखल‎




शेंदुरजना घाट पोलिस ठाण्याच्या ‎हद्दीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन ‎तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या ‎‎केल्याची धक्कादायक घटना समोर‎ आली आहे. तिने मृत्यूपूर्व लिहिलेल्या ‎‎चिठ्ठीनुसार, तिच्या अल्पवयीन ‎प्रियकराने तिच्यावर बळजबरीने‎ अत्याचार केला, तसेच तिला प्रचंड ‎‎शारीरिक व मानसिक त्रास दिला. या‎संपूर्ण प्रकारामुळे आपल्या वडिलांची ‎‎समाजात इज्जत जाऊ नये, या भीतीने ‎‎खचलेल्या या अल्पवयीन मुलीने ‎टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले. ‎‎उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. ‎‎याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या मुख्य ‎‎अल्पवयीन प्रियकरासह, त्याला साथ‎देणारा त्याचा मित्र आणि मृतक मुलीच्या ‎दोन मैत्रिणींविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी‎ 7 जुलैला गुन्हा नोंद केला आहे.‎ संबंधित अल्पवयीन मुलगी सोमवारी 6 जुलैला दुपारच्या सुमारास राहत्या घरी ‎‎चक्कर येऊन पडली. तिने उलट्या ‎केल्या. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी ‎तिला उपचारासाठी वरुड येथील ‎रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची‎ प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी ‎तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या‎ रुग्णालयात रेफर केले. दरम्यान, तिथे ‎इलाज सुरू असतानाच या मुलीचा मृत्यू ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎झाला. या अनपेक्षित घटनेमुळे मुलीच्या ‎कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ‎सुरुवातीला मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण‎ समोर आले नव्हते; तिने विष प्राशन‎ केले, पण का केले? हा प्रश्न कुटुंबीयांना ‎पडला होता.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎दरम्यान, मुलीच्या मृत्यूनंतर तिची आई ‎घरी परतली आणि तिने मुलीची कॉलेज ‎बॅग तपासली. त्यावेळी त्या बॅगमध्ये‎ मुलीने मृत्यूपूर्व लिहिलेली एक चिठ्ठी‎ (सुसाइड नोट) सापडली. या चिठ्ठीत‎ मुलीने वेदनादायी वास्तव लिहून ठेवले‎ होते. तिचे एका 17 वर्षीय अल्पवयीन‎ तरुणासोबत गेल्या दहा महिन्यांपासून‎ प्रेमसंबंध होते. या मुलाने तिच्यावर‎ बळजबरीने बलात्कार केला होता. तिचा‎ शारीरिक छळही केला होता. या‎ प्रकरणात त्याला त्याचा एक मित्र साथ ‎देत होता, तर मुलीच्या स्वतःच्या दोन‎ मैत्रिणी तिला मानसिक त्रास देत होत्या.‎या छळामुळे मला काय करावे, हे‎ समजत नव्हते, परंतु घडलेल्या या‎ प्रकारामुळे माझ्या वडिलांच्या इज्जतीला ‎मोठा धक्का बसू शकतो; म्हणून मी हा‎ टोकाचा निर्णय घेत आहे,’ असे तिने‎ चिठ्ठीत नमूद केले होते.‎ मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये मुलीने या‎ चौघांनाही कठोर शिक्षा व्हावी, अशी हाक ‎दिली आहे. ही चिठ्ठी वाचताच मुलीच्या ‎आईसह कुटुंबाला धक्का बसला.‎या प्रकरणी मुलीच्या आईने शेंदुरजना घाट‎ पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलीच्या ‎प्रियकरासह त्याचा मित्र आणि मुलीच्या ‎दोन मैत्रिणी अशा चौघांविरुद्ध तक्रार‎ केली. या तक्रारीवरून पोलिसांनी 7‎ जुलैला उशिरा रात्री चौघांविरुद्ध‎आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, ‎प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि ‎पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.‎मुलीचा प्रियकर हा अल्पवयीन‎ असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात‎ घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर ‎केले आहे.‎ इनसाइड‎ पीडित मुलीवर तिच्या प्रियकराने‎ बळजबरीने बलात्कार केला होता, हा ‎धक्का त्या मुलीसाठी सहनशक्तीच्या ‎पलीकडचा आणि प्रचंड असह्य असा‎ होता. त्यातच भर म्हणून, तिच्या दोन‎ मैत्रिणी आणि प्रियकराचा मित्र हे ‎वेळोवेळी तिच्यावर शेरेबाजी‎ करायचे, तिला टोमणे मारायचे. या सततच्या मानसिक ‎छळामुळे पीडित मुलगी अत्यंत तीव्र‎ मानसिक तणावाखाली आली होती.‎ हा बदनामीकारक प्रकार भविष्यात ‎अन्य कुणाला माहीत झाला, तर याचा ‎थेट ताण आपल्या वडिलांवर येईल‎ आणि आपल्यामुळे वडिलांना त्रास‎ झालेला आपण सहन करू शकत ‎नाही, याच भावनेतून तिने हे अत्यंत ‎टोकाचे पाऊल उचलले, असेही तिने‎ मृत्यूपूर्व चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले‎ आहे.‎ चिठ्ठीतील मजकुराच्या आधारे चौघांविरुद्ध गुन्हे दाखल‎ घडलेला प्रकार अत्यंत गंभीर‎ आहे. अल्पवयीन मुलीने लिहिलेली ‎मृत्यूपूर्व चिठ्ठी जप्त केली आहे. त्या ‎चिठ्ठीतील मजकुराच्या आधारे‎ आम्ही चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले‎ आहेत. मुख्य संशयित अल्पवयीन ‎मुलाला ताब्यात घेऊन बाल न्याय‎मंडळासमोर हजर करण्यात आले‎ आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल‎ आणि विस्तृत तपास सुरू आहे.”‎ -राहुल गवई, ठाणेदार, शेंदुरजना‎घाट, पोलिस ठाणे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *