![]()
रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरकुले, सिंचन विहिरी आणि गाय गोठ्यांची कामे पूर्ण करूनही गेल्या दोन वर्षांपासून हक्काचा मोबदला न मिळाल्याने पैठण तालुक्यातील पाडळी-गाजीपूर येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, शुक्रवारी पंचायत समिती येथे ढोल बजाव आंदो
.
काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली, तरी बिले थकीत असल्याने लाभार्थ्यांची कोंडी झाली आहे. याबाबत पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळाल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. पाडळीच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर ढोल वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सभापती वैशाली बोंबले यांना मागण्यांचे निवेदन देत बिले तातडीने अदा करण्याची मागणी केली.