![]()
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १८ जागा जिंकल्या असून उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनीही महायुतीच्या पॅनलमधून विजय संपादन केला. २० पैकी १९ सदस्य महायुती पॅनलचे असल्याने बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महायुतीचे होणार यात दुमत नाही. अध्यक्षपदी मिळवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला ३ सदस्य आपल्याकडे खेचण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि अपक्ष अनिल बोरसे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपची संचालक संख्या ९ झाली आहे. भाजप आता अध्यक्षपदावर आपला मजबूत दावा ठोकू शकतो. कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी सावध प्रतिक्रिया देत १९ सदस्य महायुतीच्या पॅनलवर लढले असल्याने आपलेच असल्याचे सांगितले आहे. जिल्हा बँकेचे नेतृत्व मिळण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेची रस्सीखेच आहे. मुंबई येथे मंगळवारी (१४ जुलै) कॅबिनेट मंत्री सावे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीचे सदस्य अर्जुन पाटील व सुवर्णा जाधव यांच्यासह अपक्ष अनिल बोरसे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. ३ सदस्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपची सदस्य संख्या ९ झाली आहे. अध्यक्षपदासाठी प्रयत्न जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजप आणि शिंदेसेनेचे प्रत्येकी ९ सदस्य झाले आहेत. महायुतीच्या पॅनलमध्ये असलेले उद्धवसेनेचे नेते, आमदार अंबादास दानवे शिंदेसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता धूसर आहे. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यास त्यांचे २० पैकी १० सदस्य होतात. त्यामुळे भाजपला बँकेची सत्ता मिळवता येऊ शकेल, असे मानले जाते. विकासासाठी पाठिंबा जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादकांच्या हितासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहोत. कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. शेतकरी, श्रमिक, कष्टकरी आदींच्या हितासाठी बँकेच्या माध्यमातून काम करणार आहोत. ग्रामीण भागाचे हित लक्षात घेता आपला महायुतीला पाठिंबा राहील. – अनिल बोरसे, नवनियुक्त सदस्य, जिल्हा बँक.
Source link
जिल्हा सहकारी बँकेत निवडून आलेले 3नवे संचालक भाजपच्या तंबूत दाखल:अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिंदेसेना, भाजपमध्ये रस्सीखेच सुरू