Headlines

नागपूर हादरले!:कुटुंबाच्या हट्टापायी चार वर्षांच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट; तरुणाचा मृत्यू, तरुणी आयसीयूमध्ये गंभीर!




नागपूरहून एक अतिशय हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरच्यांच्या टोकाच्या विरोधामुळे एका तरुण प्रेमीयुगुलाने एकत्र जगता आले नाही तरी एकत्र मरण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. वानाडोंगरी परिसरातील या घटनेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, विशाल विलास जावडे असे मृत तरुणाचे नाव आहे. विशालची प्रेयसी सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्यावर नागपूरमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कुटुंबीयांच्या हट्टापायी फुलण्याआधीच कोमेजले प्रेम विशाल विलास जावडे (वय २१, रा. वानाडोंगरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशाल हा रिक्षा चालवून आणि मंडप डेकोरेशनचे काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. गेल्या चार वर्षांपासून त्याचे एका २० वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा घरच्यांच्या संमतीने, रितीरिवाजाप्रमाणे संसार थाटावा, अशी या दोघांची प्रामाणिक इच्छा होती. त्यानुसार त्यांनी आपापल्या घरी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांनी या नात्याला आणि लग्नाला तीव्र विरोध दर्शवला. रविवारी याच कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मोकळ्या मैदानात घेतला टोकाचा निर्णय घरच्यांच्या विरोधामुळे हे प्रेमीयुगुल प्रचंड मानसिक दडपणाखाली आणि नैराश्यात होते. आपण एकत्र जगू शकणार नाही, या भीतीने त्यांनी अखेरचा मार्ग निवडला. तरुणाचा मृत्यू, तरुणीची प्रकृती चिंताजनक रुग्णालयात उपचाराचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच, सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विशालची प्राणज्योत मालवली. तरुणीवर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून तिची प्रकृती अजूनही अत्यंत गंभीर आहे. पोलीस तपास सुरू घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीयांच्या ताठर भूमिकेमुळे एका हसत्याखेळत्या तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण वानाडोंगरी परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *