Headlines

चित्रकलेत यश मिळवण्यासाठी चौफेर वाचनाचा व्यासंग आवश्यक:राज्यस्तरीय प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा; अतिथींनी केले मार्गदर्शन‎




बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय व ललित कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ परिसरातील बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयात राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. चित्रकलेच्या विश्वात नाव अजरामर करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सभोवतालचे बारकाईने निरीक्षण करणे शिकले पाहिजे. सभोवतालच्या घटना पाहणे. कान व डोळे सतत उघडे ठेवणे. सतत काम करणे. सातत्याने चौफेर वाचनाची आवड निर्माण करणे. ही सफल चित्रकाराची उत्तम लक्षणे आहेत. विद्यार्थ्यांनी याच सूत्राची कास धरून आपले कला- कौशल्य विकसित करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. स्व. बाबासाहेब ढोणे यांच्या ३२ व्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित स्पर्धेचे उद्घाटन व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी केले. ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून कला संचालनालयाचे माजी निरीक्षक भास्कर तिखे, प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार सतीश पिंपळे, नगरसेवक अॅड. गिरीश गोखले, ललित कला अकादमीचे अध्यक्ष प्रा. सुरेश राऊत, ललित कला अकादमीचे प्रशांत देशमुख, निवृत्त कलाशिक्षक मोहन भोजापुरे, चित्रकला महाविद्यालयाचे पदाधिकारी शंकरराव गिऱ्हे, कृष्णा आढाव, सुनीलकुमार नागपुरे, राजश्री देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे, डॉ. श्रीकृष्ण सीताराम ढोणे आदी उपस्थित होते. या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत राज्यातील अनेक जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला. अध्यक्षीय मार्गदर्शन दिलीप देशपांडे यांनी केले. कला ही मानवी जीवनासाठी किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन अधोरेखित केले. कलाप्रदर्शनाचे परीक्षण संजय आगाशे व आशिष चौथे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा नागपुरे यांनी केले. आभार वैशाली उमेकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी प्रा. मृण्मयी बोबडे व जवाहर भड यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेत कलाकार विभागातून प्रथम पारितोषिक अंकित इंगळेने (पातूर) यांनी पटकावले. द्वितीय पारितोषिक यश कांबे (अकोट). तृतीय सत्यजित हाडे (अकोला). उत्तेजनार्थ चंद्रशेखर उमेकर (अकोला), प्रसन्न रावदेव (अकोला) यांना देण्यात आले. विशेष पारितोषिक पुण्याचे चंद्रशेखर कुमावत व नाशिकचे मुंजा नरवाडे यांना देण्यात आले. विद्यार्थी विभागातून प्रथम पारितोषिक गौरव चतुर्वेदी (संभाजीनगर). द्वितीय दर्शन मोरे (संभाजीनगर). तृतीय सोज्वल बडवईक (नागपूर). उत्तेजनार्थ पारितोषिक हिमांशू बायसकर (नागपूर), मोहिनी विश्वकर्मा (अकोला) यांना देण्यात आले. विशेष पारितोषिक नंदिनी सुगत (अमरावती), ओम खेडकर (दर्यापूर), ऋषिकेश भोलनकर (अकोला), उज्वल वानखडे (अमरावती) यांना देण्यात आले. दिव्यांग विभागात विशेष पुरस्कार वैभव सांगळे यांना प्रदान करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *