Headlines

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:'कॉन्ट्रॅक्ट किलर' बनू शकतो प्रमुख साक्षीदार, 'फ्री सेक्स ग्रुप'चाही धक्कादायक खुलासा




पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, पोलीस तपासात या दोघांनी ‘कॉन्ट्रॅक्ट किलरला’ दिलेली सुपारी, चौकशीतून वाचण्यासाठी पाहिलेले ‘जपानी व्हिडिओ’ आणि हॉटेलमधील त्यांच्या ‘फ्री सेक्स ग्रुप’ बाबत अत्यंत गंभीर व हादरवणारी माहिती समोर आली आहे. केतन अग्रवाल याला लोहगडावरून दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्यावर आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पुणे पोलिसांकडून अत्यंत सखोल तपास सुरू असून, दररोज नवनवीन तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे हाती लागत आहेत. 16 जुलै रोजी वडगाव मावळ न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ऐनवेळी मागे फिरलेला ‘कॉन्ट्रॅक्ट किलर’ बनू शकतो साक्षीदार एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, केतनची हत्या करण्यासाठी सिया आणि चेतनने सुरुवातीला एका कॉन्ट्रॅक्ट किलरला शोधले होते. एका कॅफेमध्ये त्यांची या व्यक्तीसोबत मीटिंगही झाली होती. मात्र, केतन अग्रवाल कोण आहे हे समजल्यानंतर तो घाबरला आणि त्याने ऐनवेळी माघार घेतली. आता हीच व्यक्ती सिया आणि चेतनविरोधातील सर्वात प्रमुख साक्षीदार ठरणार आहे. या मीटिंगच्या कॅफेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. ‘स्लो पॉइझन’ देण्याचा कट फसला हत्येची सुपारी देण्यापूर्वी, केतनला ‘स्लो पॉइझन’ देऊन मारण्याचा किंवा त्याला कायमचे अपंग करण्याचा कटही या दोघांनी आखला होता. मात्र, त्यांना विष मिळाले नाही, त्यामुळे हा डाव फसल्याचे बोलले जात आहे. चौकशीतून वाचण्यासाठी पाहिला 2 तासांचा ‘जपानी व्हिडिओ’ पोलिसांच्या चौकशीत कसे शांत राहायचे आणि कठीण प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने द्यायची, याचे प्रशिक्षण घेण्यासाठी सिया आणि चेतनने तब्बल दोन तासांचा एक ‘जपानी व्हिडिओ’ पाहिला होता. या दोघांच्या मोबाइलच्या वेब हिस्ट्रीमधून पोलिसांनी या व्हिडिओच्या लिंक्स जप्त केल्या आहेत. हत्येसाठी लोहगडाचीच निवड का? मार्च 2025 मध्ये लोहगडावरच एका 21 वर्षीय विधी शाखेच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता, ज्याची नोंद आत्महत्या म्हणून झाली होती. ही बातमी वाचून सियाने लोहगडाची निवड केली. तेथे सीसीटीव्ही नाही, गर्दी नसते आणि केतनला ट्रेकिंगची आवड असल्याने त्याला तिथे नेणे आणि हत्येला अपघात भासवणे सोपे जाईल, हा सियाचा कट होता, असे सांगितले जात आहे. चेतनचे हॉटेलमधील ‘कांड’ आणि ‘फ्री सेक्स ग्रुप’? एबीपी माझाच्या वृत्तानुसार, सिया आणि चेतन केवळ मित्र नव्हते, तर ते एक ‘फ्री सेक्स ग्रुप’ चालवत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. पुण्यात ते 4-5 हॉटेल्समध्ये नेहमी भेटत असत. एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये सिया आणि चेतन एका रूममध्ये जाताना दिसतात. तास-दीड तासानंतर सिया बाहेर येते आणि त्यानंतर चेतनसोबत त्याच रूममध्ये दुसरी मैत्रीण जाताना दिसते, असा संतापजनक प्रकार तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज, वेब हिस्ट्री आणि हॉटेलमधील नोंदींच्या आधारावर अत्यंत भक्कम पुरावे गोळा करत आहेत. सुपारी नाकारून मागे फिरलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा साक्षीदार म्हणून नोंदवला जाणारा जबाब, या प्रकरणात सिया आणि चेतनला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत निर्णायक आणि महत्त्वपूर्ण ठरू शकतो अशी चर्चा. सिया म्हणाली- केतनशी लग्न करण्यास नकार दिला, पण त्याने ऐकले नाही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या चौकशीत सियाने सांगितले की तिने केतनला सांगितले होते की तिला हे नाते पुढे चालू ठेवायचे नाही. लग्नालाही नकार दिला होता. पण केतनने तिचे ऐकले नाही आणि लग्नाच्या तयारीला लागला. 31 मे रोजी मारण्याची कल्पना सुचली, 18 जून रोजी खून 31 मे: सियाला केतनच्या हत्येचा कट सुचला: 11 फेब्रुवारी रोजी साखरपुड्यानंतर केतन, सियाला घरी घेऊन येत असे, सोबत फिरायला घेऊन जात असे. त्याला ट्रेकिंग म्हणजे डोंगर चढण्याचा छंद होता. त्याने सियाला ट्रेकिंगसाठी लोहगड किल्ल्यावर जाण्यास सांगितले. अहवालानुसार जेव्हा दोघे किल्ल्याच्या सर्वात उंच शिखरावर पोहोचले, तेव्हा इथेच सियाला पहिल्यांदा केतनपासून सुटका करून घेण्यासाठी त्याला डोंगरावरून ढकलून मारण्याचा कट सुचला. ५ जून: किल्ल्यावर जाण्याचा हट्ट केला, केतन गेला नाही: सियाने ४ जून रोजी केतनला पुन्हा लोहगड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट केला. तेव्हा केतनच्या घरच्यांनी नकार दिला. ६ जून रोजी केतन, त्याची बहीण, एक मित्र आणि सियाचे इंडोनेशियातील बालीला जाण्याचे तिकीट बुक झाले होते. सर्वजण विमान पकडण्यासाठी निघाले. पुणे ग्रामीणचे एसपी संदीप सिंह गिल यांच्या मते, केतनसोबत बालीला जावे लागू नये म्हणून सियाने त्याचा पासपोर्ट आपल्याजवळ वेगळा ठेवला होता. १४ जून: दुसरा प्रयत्न, धक्का दिला, पण केतन वाचला: सियाने केतनला पुन्हा किल्ल्यावर जाण्यास सांगितले. ती म्हणाली की मला ती जागा आवडते. पोलिसांनुसार, १४ जून रोजी दोघे किल्ल्यावर पोहोचले. सियाने केतनला एका ठिकाणी मागून धक्का दिला. झाडाचा आधार मिळाल्याने केतन वाचला. त्याने विचारले- ‘धक्का का दिला?’ सिया म्हणाली, ‘एक साप होता, तुला त्यापासून वाचवण्यासाठी धक्का दिला.’ केतनने घरी येऊन सर्वांना सांगितले की सियामुळे त्याचे प्राण वाचले. 18 जून: तिसऱ्या प्रयत्नात प्रियकरासोबत मिळून धक्का दिला: 19 जून रोजी सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतनने महाबळेश्वरमध्ये एक आलिशान रिसॉर्ट बुक केले होते. त्याआधी सियाने केतनला प्री-वेडिंग फोटोशूटची गोष्ट सांगून लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी राजी केले. यावेळी चेतनही त्यांच्या मागे होता. एका ठिकाणी जेव्हा केतन डोंगरांकडे पाहत होता, तेव्हा दोघांनी त्याला मागून धक्का दिला. तीन पुरावे; सियाचे खोटे, CCTV फुटेज, 2004 वेळा कॉल पहिला पुरावा: सियाच्या हावभावांवरून केतनच्या बहिणीला संशय आला मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 जून रोजी सिया केतनच्या घरी पोहोचली. केतनच्या बहिणीने विचारले – केतन कसा पडला? या प्रश्नावर सियाचे हावभाव अचानक बदलले. ती व्यवस्थित उत्तर देऊ शकली नाही. केतनच्या बहिणीला संशय आला आणि तिने वडील विशाल अग्रवाल यांना सांगितले – भाऊ चांगला ट्रेकर आहे, त्याचा मृत्यू अपघात असू शकत नाही. सिया व्यवस्थित उत्तर देत नाहीये. विशाललाही आधीपासूनच संशय होता की काहीतरी गडबड आहे. यानंतर विशाल पुन्हा पुणे पोलिसांना भेटले आणि सियावर संशय व्यक्त केला. त्यांनी असेही सांगितले की सिया एका मुलाशी बोलते, त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे. दुसरा सुगावाः किल्ल्याच्या CCTV फुटेजमध्ये उन्हाळ्यात हुडी घातलेला मुलगा दिसला उन्हाळ्याचे दिवस, वरून किल्ल्याची चढाई, तरीही किल्ल्याच्या पायऱ्यांवरील फुटेजमध्ये तो हुडी घातलेला दिसला. पोलिसांनुसार, तो मुलगा आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. तिसरा सुगावा: सियाचे एका नंबरवर 2000 हून अधिक कॉल्स पोलिसांनी सियाचे कॉल-रेकॉर्ड तपासले. यामध्ये एका मोबाईल नंबरवर जानेवारीपासून केतनच्या हत्येच्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत सियाने 2004 कॉल्समध्ये सुमारे 338 तास बोलणे केले होते, म्हणजेच दोघे रोज सुमारे 11 कॉल्समध्ये 2 तास बोलत होते. हा नंबर पुण्यातल्याच आणखी एका व्यापारी कुटुंबातील चेतन चौधरी नावाच्या मुलाचा होता. चेतनचे घर पुण्यात त्याच परिसरात होते, जिथे सियाच्या वडिलांचे कार्यालय आहे. हत्येची 2 कारणे; दावा- सिया लग्नासाठी तयार नव्हती सिया लग्नासाठी तयार नव्हती: पोलिसांना संशय आहे की मुख्य आरोपी सिया गोयल लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती आणि कुटुंबाच्या दबावामुळे केतनशी लग्न करणार होती. याच पैलूला पोलीस हत्येच्या संभाव्य कारणांपैकी एक मानून तपास करत आहेत. बदनामीमुळे प्रियकरासोबत पळून गेली नाही: प्रियकर चेतनने सांगितले की सिया साखरपुडा मोडून पळून जाण्याच्या बाजूने नव्हती. तिला वाटत होते की यामुळे तिच्या कुटुंबाची बदनामी होईल. केतन रिअल इस्टेट व्यावसायिक होता, लग्नासाठी 17 कोटींना पॅलेस बुक केला होता केतन अग्रवाल पुण्याच्या गहुंजे येथील रहिवासी होते. ते रिअल इस्टेट व्यावसायिक आणि सक्सेस ग्रुपचे संचालक विशाल अग्रवाल यांचे पुत्र होते. विशाल यांना पुण्याच्या रिअल इस्टेट वर्तुळात ‘लँड बँक’ मानले जाते. केतन देखील कंपनीत संचालक आणि मुख्य विपणन अधिकारी (CMO) पदावर होते. त्यांनी सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीमधून BBA केले होते. अमेरिकेतील बॅबसन एफ.डब्ल्यू. ओलिन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी एंटरप्रेन्योरशिपमध्ये मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली. सिया एका ड्रायफ्रूट्स व्यावसायिकाची मुलगी आहे. नोव्हेंबरमध्ये दोघांचे लग्न होणार होते. यासाठी राजस्थानमध्ये 17 कोटी रुपयांचा एक पॅलेस बुक करण्यात आला होता. पाहुण्यांसाठी दोन चार्टर्ड प्लेन बुक केले होते. खुनापूर्वी सियाचा होणाऱ्या नवऱ्यासोबत डान्स, रोमान्स; 3 फोटो केतनच्या खुनापूर्वी सियाने सोशल मीडिया अकाउंटवर केतन अग्रवाल (26) सोबत अनेक रोमँटिक पोस्ट केल्या होत्या. कधी प्रपोजलचे फोटो, कधी फुले देऊन प्रेम व्यक्त करणारे क्षण, तर कधी डान्स आणि मिठी मारण्याचे व्हिडिओ. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या दोघांच्या लग्नाची तयारीही सोशल मीडिया पोस्टचा भाग होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यानंतर सियाने इंस्टाग्रामवर एका केकचा फोटो शेअर करत लिहिले होते- माझ्या हृदयाला त्याचे घर मिळाले, एक महिना पूर्ण झाला. केतन अगरवाल हत्या प्रकरण: चेतनचा कर्मचारी नीरज कुमार झाला ‘माफीचा साक्षीदार; कर्मचाऱ्याचा मोबाईल घेत गेला होता लोहगडावर वडीलांची माहिती पुणे मर्डर- केतनला टेकडीच्या कडेला बसलेले पाहिले: सियाला तेव्हाच त्याला खाली ढकलण्याची कल्पना सुचली; यातून वाचल्यास रस्ते अपघाताचा प्लॅन B तयार होता केतन अग्रवाल खून प्रकरण: सियाच केतनच्या जवळ उभी हाेती, मी तर दूर उभा होतो- चेतन चौधरी, चेतनने केतन अग्रवालच्या खुनाचा तपशील सांगितला केतन अग्रवाल खून प्रकरणावरून भडकली अभिनेत्री: आंचल खुराना म्हणाली- सियाला धक्का देऊन संपवून टाकायला पाहिजे, कोणतीही केस होऊ नये लोहगडवरील हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा: 14 जूनलाही झाला होता केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न! वडिलांचे गंभीर आरोप व्यावसायिक केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नव्हे, खून: होणाऱ्या पत्नीने मित्रांच्या मदतीने केली हत्या, पुणे ग्रामीण पोलिसांचा खुलासा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *