Headlines

Maharashtra ST Bus Fare Hike; Transport Authority Approves 13 Percent Increase


महागाईच्या गर्तेत अडकलेल्या राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना आणखी एक मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला अधिकृत मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय घड

.

एसटी महामंडळाची आर्थिक घडी बसवण्यासाठी आणि प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य बनली होती. प्रशासनाने या दरवाढीमागे खालील प्रमुख कारणे दिली आहेत.

  • आंतरराष्ट्रीय इंधन संकट: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.
  • कर्मचाऱ्यांचे भत्ते: एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करून करण्यात आलेली वाढ.
  • देखभाल खर्चात वाढ: गाड्यांचे सुटे भाग (Spare Parts), टायर आणि दैनंदिन देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ.

वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कामकाजावर मोठा आर्थिक ताण निर्माण होत होता. सेवा कोलमडू नये आणि ती अधिक सक्षम व टिकाऊ व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात येणार आहे.

अशी असेल भाडे दरवाढ

प्रवाशांवर कमीत कमी भार टाकण्याचा प्रयत्न– परिवहन मंत्री

या महत्त्वपूर्ण भाडेवाढीबाबत बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आखाती देशांतील युद्ध आणि जागतिक परिस्थितीमुळे डिझेल, सुटे भाग आणि टायरच्या किमती खूप वाढल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचे भत्ते वाढल्याने ही भाडेवाढ करणे अपरिहार्य ठरले. मात्र, ही वाढ करताना सर्वसामान्य प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची आम्ही विशेष काळजी घेतली आहे. एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि जनतेला सुरक्षित सेवा देणे हाच यामागील उद्देश आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर आपला विश्वास कायम ठेवावा.”

३१ जुलैपर्यंतची हंगामी भाडेवाढ आता रद्द

एसटी महामंडळाकडून उन्हाळी आणि सणासुदीच्या गर्दीच्या हंगामात साध्या बसेससाठी १० टक्के अतिरिक्त प्रवास भाडेवाढ लागू करण्यात आली होती. या हंगामी वाढीची मुदत १५ जुलै रोजी संपली होती. मात्र, महामंडळाने ती मुदत पुढे वाढवून ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकारने थेट मुख्य भाड्यातच १३.५६ टक्के वाढ केल्यामुळे, हा ३१ जुलैपर्यंतचा जुना १० टक्के अतिरिक्त भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यात आला आहे.

जरी हंगामी वाढ रद्द झाली असली, तरी मूळ भाड्यात मोठी वाढ झाल्यामुळे प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण आणि मध्यमवर्गीय प्रवाशांच्या घरगुती बजेटवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे.

हे ही वाचा…

आमदार म्हणजे काय समजता?:बैठकीची लिंक न मिळाल्याने भास्कर जाधव भडकले; तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांना धरले धारेवर

आपल्या कडक स्वभावासाठी आणि सभागृहातील चौफेर आक्रमक शैलीसाठी नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांचा संताप आता एका शासकीय बैठकीत पाहायला मिळाला आहे. रत्नागिरी येथे आयोजित ‘दिशा’ आणि ‘रस्ता सुरक्षा’ समितीच्या ऑनलाईन बैठकीची लिंक वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या भास्कर जाधव यांनी थेट जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले, तर बैठकीचे अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनाही ऑनलाईन बैठकीतच खडे बोल सुनावले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.