Headlines

अमरकंद वनस्पतीची तस्करी करणाऱ्या ‎सिल्लोडमधील तिघांना अटक:5 किलो कंद आणि दोन दुचाकी जप्त




सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील डोंगराळ भागातून अत्यंत दुर्मिळ आणि औषधी मानल्या जाणाऱ्या अमरकंद वनस्पतीची बेकायदेशीरपणे तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. गुरुवारी झालेल्या या कारवाईत संशयितांकडून ५ किलो अमरकंद आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. घटांब्री येथील नासेर यासीन पठाण (२९), वाजेद जुम्मा पठाण (३१) आणि शारूख मुस्तफा शेख (३०) अशी अटक करण्यात आलेल्या वनतस्करांची नावे असून, त्यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोऱ्हाळा तांडा, आधारवाडी आणि सिरसाळा परिसरातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमरकंद साठवून ठेवल्याची माहिती वन्यजीव व वनस्पती संवर्धक डॉ. संतोष पाटील यांना मिळाली होती. त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या उपवनसंरक्षक सुवर्ण माने यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली. त्यानंतर सोयगाव वनपरिक्षेत्राचे वनपाल सुभाष नागरे आणि त्यांच्या पथकाने केळगावच्या जंगलात सापळा रचला. कंद खोदून काढत असतानाच या तिघांना वनविभागाने बेड्या ठोकल्या. गेल्या दोन महिन्यांत या भागातून तब्बल २ ते ४ टन अमरकंदाची तस्करी झाल्याची भीती डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे. जैवविविधतेचा मुख्य आधार धोक्यात Ãवैज्ञानिक भाषेत युलोपिया ऑर्किड म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती जमिनीवर वाढणारे एक परजीवी कंद आहे. या वनस्पतीला येणारी भडक गुलाबी फुले आणि त्यांचा सुगंध मधमाशा, फुलपाखरे यांना अन्न पुरवण्याचे काम करतात. डार्क ग्रास ब्लू आणि निलगिरी टीट या जातींची दुर्मिळ फुलपाखरे याच पानांवर अंडी घालतात. रानडुक्कर, हरिण, सायाळ या वन्यजीवांचे हे मुख्य अन्न आहे. मात्र, केवळ अफवा आणि गैरसमजापोटी या जंगलाच्या संरक्षकाची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. डोंगरालगतच्या गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वन समित्या अधिक सक्षम करण्यास आमचे प्राधान्य राहील, जेणेकरून अशा मौल्यवान वनसंपदेची तस्करी रोखता येईल. -डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड व्हिडिओमुळे वाढली तस्करी कोरोना काळानंतर अहिल्यानगर येथील एका वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये अमरकंदामुळे मणक्याचे आजार, संधिवात, हाड दुखी बरी होते आणि माणसाला चिरतरुणपण लाभते, असा दावा करण्यात आला होता. या व्हिडिओनंतर राज्यभरात वनतस्कर सक्रिय झाले. केळगाव, घटांब्री, तोंडापूर, अजिंठा लेणी परिसर, नागद आणि गौताळा अभयारण्याच्या अजिंठा डोंगररांगांमध्ये या वनस्पतीचा शोध सुरू झाला. तस्करांनी स्थानिक लोकांना पैशांचे आमिष दाखवून डोंगरातून कंद उपसण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *