Headlines

पुण्यात ‘नीट’च्या निकालानंतर 2 जणांच्या आत्महत्या:नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज




‘नीट’ परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. या निकालानंतर पुण्याच्या हडपसर भागातील महंमदवाडीत एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अनुष्का चौगुले (रा. सॅफ्रॉन हिल सोसायटी, महंमदवाडी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई घरातील कामात व्यग्र असताना अनुष्काने बराच वेळ खोलीचा दरवाजा उघडला नाही. आईने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. त्या वेळी अनुष्काने गळफास घेतल्याचे विदारक दृश्य समोर आले. नीट पुन्हा देऊनही कमी गुण, तरुणाची आत्महत्या जामनेर | ‘नीट’ ची परीक्षा पुन्हा देऊ नये अपेक्षित गुण न मिळाल्याने नागन चौकी (ता. जामनेर) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. समर्थ ज्ञानेश्वर पाटील या वीस वर्षीय नीट परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण मिळाले नव्हते. त्यामुळे त्याने दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यातही कमी गुण मिळाल्याने त्याने जीवन संपवले. पुण्यात पाचव्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकत होती पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना धनकवडीतील निर्मल पार्क सोसायटीत घडली. ती नेमकी कशी पडली किंवा तिने आत्महत्या केली, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. रिद्धी रवी केडिया (१७, रा. निर्मल पार्क सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) असे मृत्युमुुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिद्धी ही एका महाविद्यालयात बारावीत होती. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्व झोपले. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रिद्धीच्या आजीला जाग आली. रिद्धी घरात दिसली नाही. खोलीचा दरवाजा बंद होता. सदनिकेतील गॅलरीत त्यांनी स्टूल ठेवलेला पाहिला. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. केडिया कुटुंबीय सोसायटीतील तळमजल्यावर आले. तेव्हा रिद्धी सोसायटीच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कुटुंबीयांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली. तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *