राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील अंतर्गत धुसफूस आता अधिकृतपणे चव्हाट्यावर आली आहे. पक्षाच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक आणि तितकीच संतप्त पोस्ट शेअर करत थेट नाराजी व्यक
.
अजितदादांच्या पश्चात परिस्थिती भयावह
रुपाली ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या कार्यपद्धतीची आठवण काढत सध्याच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, “अजितदादा मला माफ करा. मी कायम आपल्या ऋणात आहे. तुम्ही असताना अन्याय करणाऱ्यांना, पक्षात चाटेगिरी, फुशारकी, नाहक गोंधळ घालणाऱ्यांना, काटाकटी करणाऱ्या नेत्यावर वचक होता आणि कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणाऱ्यांना लोकांवर वचक शब्दाचा धाक होता. तुम्ही काम करणाऱ्या कार्यकर्ताचे,पदाधिकारीचे खमके खंबीर आधार होता. तुमच्याच शब्दाचा मान ठेवून आम्हीही अनेकदा शांत राहिलो. पण तुम्ही गेल्यानंतर काहींनी पक्षातील परिस्थिती अधिकच भयावह केली,” असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
आता कठोर भूमिका घ्यावी लागणार
रूपाली पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “कार्यकर्त्यांचा, पदाधिकारीचा संयम हा कमकुवतपणा समजण्याची चूक केली. आता अन्याय, दडपशाही आणि विश्वासघात यापुढे सहन करणार नाही. म्हणूनच, मा. अजितदादा, मला माफ करा… आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. दुर्गाकाली रूप घ्यावे लागणार.”
राजकारण वंगाळ करणाऱ्यांना सोडणार नाही!
“तुम्ही असताना आणि तुम्ही नसताना पक्षातील वातावरणाचाल किती मोठा फरक आहे, हे प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याला जाणवत आहे. आम्ही तुमची माणसं होतो, आहोत आणि कायम राहू. तुमची शिकवण, तुमची कामे करण्याची पद्धत आणि न्यायासाठी लढण्याची ताकद आम्ही कधीही सोडणार नाही. अजितदादा शब्द आहे. राजकारण वंगाळ करणाऱ्याना,अन्याय करणाऱ्यांना कोणालाही सोडणार नाही,” असा इशारा रूपाली ठोंबरे यांनी दिलाय.
हे ही वाचा…
सुप्रिया सुळे यांच्या घशाला सूज:डॉक्टरांनी आवाजाला विश्रांती देण्याचा दिला सल्ला; पुढील 2 आठवडे भाषणे, मुलाखती बंद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आपल्या स्पष्ट आणि आक्रमक वक्तृत्वाने नेहमीच राजकीय मैदान गाजवणाऱ्या सुप्रिया सुळे यांना आगामी काही दिवस शांत राहावे लागणार आहे. घशामध्ये सूज आल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आवाजाला पूर्ण विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. खासदार सुळे यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या प्रकृतीबाबतची ही माहिती दिली. सविस्तर वाचा…
अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर जयंत पाटलांचा खुलासा:म्हणाले- ‘दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार नाही, NDA मध्ये जाण्याचाही प्रश्न नाही’

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होणार, तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सत्ताधारी महायुतीत जाणे किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार, अशा चर्चांना जोर आला होता. मात्र, या सर्व चर्चांना आता खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. पंढरपूर येथे शक्तिपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या शेतकरी अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी एनडीएमध्ये जाण्याची किंवा अर्थमंत्रिपद स्वीकारण्याची कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्ट केले. सविस्तर वाचा…