![]()
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि ‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी ( वय ८४)यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. डॉ. सप्तर्षी यांनी युवक क्रांती दलाच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. त्यांनी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून गांधीवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्य केले. समाजकारण, शिक्षण, ग्रामीण विकास आणि लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. १९७८ मध्ये ते अहमदनगरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. १९६७ मध्ये युवक क्रांती दलाची स्थापना, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्षपद तसेच ‘सत्याग्रही’ मासिकाचे दीर्घकाळ संपादन ही त्यांच्या सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय कामगिरी मानली जाते. त्यांचे सुपुत्र डॉ. कबीर सप्तर्षी हे सध्या लंडनमध्ये असून ते रविवारी संध्याकाळी पुण्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सोमवारी (२० जुलै) आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती गांधी स्मारक च्या वतीने देण्यात आलेली आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे पार्थिव सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत कोथरूड येथील गांधी भवनमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.डॉ. सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि गांधीवादी विचारवंतांनी शोक व्यक्त केला
Source link
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन:गांधी भवनमध्ये अंत्यदर्शन, सोमवारी होणार अंत्यसंस्कार