Headlines

जगन्नाथ रथयात्रेसाठी 5 टन, 31 फूट उंच रथाची निर्मिती:राजेश्वर नगरीत भक्ती-आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम‎




श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी १९ जुलै रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), अकोलातर्फे आयोजित या रथयात्रेत भगवान श्रीजगन्नाथ आणि सुभद्रा यांच्या रथाचे नगरभ्रमण होणार असून राजेश्वर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. ५ टन लोखंडी आणि ३१ फूट उंच असलेल्या महाकाय रथाची निर्मिती करण्यात आली आहे. यंदाच्या रथयात्रेस विदर्भ झोनल सुपरवायझर अनंतशेष प्रभुजी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजता इस्कॉन मंदिर, मित्र समाज क्लब, राधेनगर येथून रथयात्रेला प्रारंभ होईल. रथयात्रेनंतर दुपारी २ वाजता श्री जगन्नाथ महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्कॉनच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी ही रथयात्रा केवळ धार्मिक मिरवणूक नसून भारतीय वैदिक संस्कृती, भक्ती परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव मानला जातो. भगवान श्रीजगन्नाथांचा रथ ओढणे हे पुण्यकारक मानले जाते. त्यामुळे विविध समाजघटकांतील नागरिक, युवक, महिला आणि बालकांचा मोठा सहभाग या सोहळ्यात असतो. अशी निघणार यात्रा रथयात्राः इस्कॉन मंदिरापासून यात्रा शासकीय वैद्यकीय महाविद्याल तथा सर्वोपचार रुग्णालय, अशोक वाटिका, शहीद मदनलाल धिंग्रा चौक, गांधी रोड, महाराणा प्रताप चौक (सिटी कोतवाली) खोलेश्वर मार्गे पुन्हा इस्कॉन सेंटर येथे समारोप होईल. मार्गभर हरिनाम संकीर्तन, भजन, कीर्तन आणि मंत्रोच्चारांनी भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. मान्यवरांचे मार्गदर्शन रथयात्रेसाठी इस्कॉन अमरावतीचे अध्यक्ष अचिंत्याचार्य प्रभुजी ,इस्कॉन अकोलाचे अध्यक्ष वैदर्भी चरण दास यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महाप्रसादासाठी तांदूळ, डाळ, पीठ, तूप, तेल, साखर, सुका मेवा, फळे दाण देण्याचे आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *