Headlines

आदिवासींच्या विकासासाठी प्रशासन, सामाजिक संस्थांमध्ये समन्वय पाहीजे:आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे प्रतिपादन‎



मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू दूर करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा व सामाजिक संस्थांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. दोन्ही यंत्रणआंनी योग्य समन्वय साधून कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशो

.

चिखलदऱ्याच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली धारणी व चिखलदरा तसेच इतर क्षेत्रातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार केवलराम काळे, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, आदिवासी महामंडळाच्या महाव्यवस्थापक श्रीमती जयरेखा, उपसंचालक सुशील वाकचौरे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. मंत्री उईके म्हणाले, मेळघाटामध्ये बालविवाहामुळे माता आणि बालकांच्या कुपोषणासारख्या तक्रारी निर्माण होतात. दोन मुलांमध्ये पुरेसे अंतर नसणे, हेदेखील कुपोषणाचे कारण आहे. यासाठी प्रशासनासोबतच अंगणवाडी सेविका आणि आशावर्कर कार्य करीत असतात.

यावर अधिक भर देऊन बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर जनजागृती करावी. दुसरीकडे मेळघाटमध्ये पुरेसा औषधसाठा नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. या भागामध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना सक्षमपणे राबवावी, असेही आदिवासी विकास मंत्री. डॉ. उईके म्हणाले.

आदिवासी बहुल क्षेत्राचा विकास साधण्यासाठी शासनासमवेत सामाजिक संस्थांनी समन्वय साधून काम करावे. यावेळी उईके यांनी महिला व बालकल्याण विभाग व त्यांच्या योजना, पाणीपुरवठा व्यवस्थापन, आरोग्य विभाग या विषायांवर संबंधितांशी चर्चा केली. शासन आणि प्रशासनाच्या सहकार्याने या भागातील कुपोषण हटवायचे आहे. आदिवासी विकास विभाग योजनेअंतर्गत विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, हे लक्षात घेता आश्रम शाळेतील पाणी प्रश्न, आरोग्य प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या या तातडीने सोडवण्यावर भर द्यावा, अशा सूचना संबंधितांना दिल्या.यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या धारणी शाखा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसाठी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. नियोजन अधिकारी वरूण कळसकर यांनी प्रास्ताविक केले. दीपश्री देशमुख यांनी संचालन तर शिक्षण विस्तार अधिकारी अनुश्री राऊत यांनी आभार मानले.

एनजीओंना पूर्वपरवानगी आवश्यक मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक संस्थादेखील कार्य करीत असतात. परंतु त्या स्वतंत्रपणे काम करतात. यापुढे प्रशासनाची पूर्वपरवानगी आणि समन्वय साधूनच सामाजिक संस्थांनी काम करावे तसेच या क्षेत्रात जनजागृतीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचार साहित्याचे शासनामार्फत प्रमाणीकरण करण्यात यावे, अशा कडक सूचनादेखील मंत्री महोदयांनी दिल्या आहेत. यामुळ‌े एनजीओंपुढे भविष्यात नवे संकट उभे राहू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *