![]()
मुख्यमंत्री सचिवालय अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २०) चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आयोजित ‘मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४४९ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. शिबिरात शल्यचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, मेडिसिन, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, कुष्ठरोग, क्षयरोग तसेच एचआयव्ही तपासणी अशा विविध विभागांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवनाथ आव्हाड आणि बोपानेचे सरपंच राहुल हांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. आव्हाड यांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना आधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शिबिरादरम्यान बोपाने येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय खंडेराव ठाकरे यांनी स्वखुशीने अवयवदानाचा अर्ज भरून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी कौतूक केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित निकम, डॉ. विकास गांगुर्डे, डॉ. रोहिणी भगत यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग अधिकारी, रुग्णालयीन कर्मचारी व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरास चांदवड व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मेडिसिन विभागात १७०, स्त्रीरोग विभागात ५६,आयुर्वेदिक विभागात ४०, नेत्ररोग विभागात ३५, शल्यचिकित्सा विभागात ३५, त्वचारोग व कुष्ठरोग विभागात २८, एचआयव्ही तपासणीत २५ आणि होमिओपॅथिक विभागात २० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
Source link
चांदवड रुग्णालयात 449 रुग्णांची तपासणी:उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी भरला अवयवदानाचा अर्ज