Headlines

अडीच लाख वैष्णवांचा ‘माउली.. माउली’चा गजर अन् अश्वांची दौड!:संत ज्ञानेश्वर पालखीचे सोलापूर जिल्ह्यातपहिले गोल रिगण




“माउली… माउली’च्या अखंड जयघोषात आणि सुमारे अडीच लाख वैष्णवांच्या साक्षीने, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे अत्यंत उत्साहात पार पडले. अश्वांची डोळे दिपवणारी दौड आणि टाळ-मृदंगाच्या निनादात अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पहाटे नातेपुते येथून प्रस्थान ठेवल्यानंतर, मांडवे ओढा येथे विश्रांती घेत दुपारी दोन वाजता पालखी पुरंदावडेच्या रिंगणस्थळी पोहोचली. चोपदारांच्या शिस्तबद्ध नियोजनानंतर मध्यभागी उभारलेल्या भव्य शामियानात पालखी विराजमान झाली. त्यानंतर स्वाराचा अश्व आणि माउलींच्या श्रीमंत अश्वाने सुसाट वेगात रिंगणाच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या. हा अद्भुत सोहळा पाहताना वारकऱ्यांच्या अंगावर भक्तीचा रोमांच उभा राहिला. अश्वांच्या टापांखालील पवित्र माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. पारंपरिक खेळ आणि नादब्रह्माची उडी रिंगण सोहळ्यानंतर वारकऱ्यांनी हुतुतू, हमामा, सुरपाट, गड्या-स-गडी, खो-खो आणि फुगड्यांसारखे पारंपरिक खेळ खेळत भक्तीचा आनंद लुटला. यानंतर सर्व दिंड्या पालखीभोवती बसल्या व टाळ-मृदंगाच्या गजरात वैष्णवांचा ‘उडी’चा कार्यक्रम रंगला. या वेळी रिंगण मार्गावर काढलेल्या रांगोळीच्या नयनरम्य पायघड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *