Headlines

Mumbai Oshiwara Crime: Husband Strangles Wife Over Suspicion


पहिल्या नवऱ्याशी सतत फोनवर बोलते, या संशयातून आणि कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच 25 वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना मुंबईतील ओशिवरा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. शबरून ने

.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत शबरून हिचा आरोपी सेराज अन्सारी याच्यासोबत हा दुसरा विवाह होता. मात्र, लग्न झाल्यानंतरही शबरून ही तिच्या पहिल्या पतीच्या संपर्कात होती आणि त्याच्याशी फोनवर वारंवार बोलत असल्याचा संशय सेराजला येत होता त्यामुळे त्याला प्रचंड राग येत होता. यावरून दोघांमध्ये रोज कौटुंबिक वाद आणि भांडणे होत होती.

भांडण विकोपाला अन् हत्या

सोमवारी रात्रीच्या सुमारास पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्यावरून पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये तुफान भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात सेराजने शबरूनचा गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी आरोपी सेराज अन्सारीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ओशिवरा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे ही वृत्त वाचा

बजाजनगरात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू:संगणक अभियंता पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हे दाखल, नातेवाइकांकडून हत्येचा संशय

बजाजनगरात सोमवारी (20 जुलै) पहाटे 30 वर्षीय कोमल योगेश मोरे या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगणक अभियंता असलेल्या पतीनेच सासरच्या मंडळींच्या साथीने कोमलचा घात केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी एम. वाळूज पोलिस ठाण्यात पतीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

3 दिवसांत नाशिकमध्ये दुसरे हत्याकांड:आर्थिक विवंचनेतून नाशिकला पत्नी व 7 वर्षीय मुलाच्या हत्येनंतर पतीचा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

जेलरोड परिसरातील अरिंगळे चाळीत आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या पतीने पत्नी आणि अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या भयंकर कृत्यानंतर पतीने स्वतः विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग दुसऱ्या हत्येच्या घटनेने संपूर्ण नाशिक शहर हादरले आहे. किरण एकनाथ हजारे (मूळ रा. भुसावळ) असे पतीचे, तर अश्विनी आणि श्रेयस अशी मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत. किरण एका रुग्णालयात ऑक्सिजन पुरवणाऱ्या एजन्सीत काम करायचा. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.