Headlines

300 जणांना शासकीय ‎योजना मंजुरीपत्र वाटप‎:लासूर येथे आमदार प्रशांत बंब यांची उपस्थिती




लासूर स्टेशन लासूर स्टेशन येथे विविध शासकीय योजनांतील ३०० पात्र लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात आमदार प्रशांत बंब यांच्या शुभहस्ते ही प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार प्रशांत बंब म्हणाले की, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. नागरिकांनी अधिक सजग राहून शासनाच्या विविध योजनांची माहिती घ्यावी आणि त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या पुढाकारातून पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करून अर्ज भरून घेण्यात आले होते. त्यानंतर संबंधित शासकीय विभागांकडे स्वखर्चाने पाठपुरावा करून या योजना मंजूर करून घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, अमोल जाधव यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरवड्यात लासूर येथील ४,५०० कुटुंबांना घरपोच रेशनकार्ड व शासकीय मंजुरी पत्रके वितरीत केली आहेत. या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक शेषरावनाना जाधव, रमेश पाटील जाधव, माजी सरपंच प्रदीप भुजबळ, तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संदीप आमराव आणि पंचायत समिती सदस्य सुनील पाखरे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासूर येथे लाभार्थींना शासकीय योजनांचे मंजुरीपत्र वाटप करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *