Headlines

अवैध सावकारीला कंटाळून 45 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या:मृत्युपुर्व चिठ्ठीत शेत हडपल्याचा आरोप, तिघांविरुद्ध गुन्हा‎




अवैध सावकारीच्या पाशात अडकलेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी २५ जुलैला सकाळी आठ वाजता उघडकीस आली. तरोडा (डोमक) येथे ही घटना उघडकीस आली आहे. पवन विश्वासराव भाकरे (४५, रा. तरोडा डोमक) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. भाकरे यांनी मृत्यूपुर्व लिहिलेली चिठ्ठी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास सारडा, नवनीत चांडक, घनश्याम गट्टाणी (रा. मोर्शी) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पवन भाकरे यांची खेड येथे शेती आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी चांदूरबाजार येथील कैलास सारडा याच्याकडून दलालामार्फत २.५० टक्के व्याजाने रक्कम उसनवारी घेतली होते. मात्र, ११ महिन्यांत पैसे परत करू न शकल्यामुळे कैलास सारडा, दलाल नवनीत चांडक, घनश्याम गट्टाणी (रा. मोर्शी) यांनी भाकरे यांच्याकडे तगादा लावून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. पैशांच्या गॅरंटीच्या नावाखाली तिघांनी भाकरे यांची जमीन स्वतःच्या नावाने खरेदी करून घेतली व पैसे परत केल्यावर शेती परत करण्याचे आश्वासन दिले. चार महिने पाच दिवसांनंतर भाकरे यांनी १ लाख ८५ हजार आणि खरेदीचा खर्च २५ हजार, असे एकूण २ लाख १० हजार चांदूरबाजार येथील जयस्तंभ चौकातील सारडा याच्या दुकानासमोर रोख स्वरूपात परत केले. परंतु, व्याजाचे पैसे दिल्याशिवाय जमीन परत करणार नाही, असे सांगत आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेती हातातून गेल्याने उर्वरित. पान ४ पाच पानांच्या चिठ्ठीत व्यक्त केली व्यथा पवन भाकरे यांनी मृत्यूपुर्वी पाच पानांची चिठ्ठी लिहीली आहे. त्यांनी पाच पानांमध्ये या सावकारी पाशाची व्यथा मांडली असून, या टोकाच्या निर्णयासाठी सारडा, गट्टाणी आणि चांडकच जबाबदारी असल्याचे नमूद केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *