![]()
अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाट आणि अहिल्यानगर-वांबोरी रस्त्यावरील डोंगरगण घाट सध्या धोकादायक बनले आहेत. पावसाळ्यात डोंगरावरील दगड व सिमेंटचे अस्तरीकरण उखडून थेट रस्त्यावर येत असल्याने अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सुद
.
यामुळे महामार्गाच्या एका पट्ट्यात मोठे दगड येऊन पडतात. सुदैवाने या दरडींखाली सापडून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद झालेली नाही. परंतु अशी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच गंभीर परिस्थिती अहिल्यानगर ते वांबोरी रस्त्यावरील डोंगरगणपुढील घाटातही दरवर्षी पाहायला मिळते.
विशेषतः रात्रीच्या वेळी रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने किंवा अचानक दगड समोर आल्यास भीषण अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठी दुर्घटना घडण्याआधीच प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या दोन्ही घाटांमध्ये आवश्यक त्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता नागरिक व वाहनधारकांमधून केली जात आहे.
पावसाळ्यात डोंगराच्या भेगांमध्ये पाणी मुरल्याने मातीची पकड सैल होते. त्यामुळे सिमेंटचे अस्तरीकरण उखडून दगड रस्त्यावर येतात. तसेच, डोंगर कटिंग करताना झालेल्या सूक्ष्म तड्यांमुळे मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होतो. मागील ४ ते ५ वर्षांपासून असे दरडी कोसळण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत.
लोखंडी जाळी, दिवे बसवावेत ^ प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी घाटातील सैल झालेले दगड काढून घ्यावेत. दरडी रोखण्यासाठी डोंगरावर मजबूत प्रोटेक्टिव्ह नेटिंग (लोखंडी जाळ्या) बसवाव्यात. तसेच धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावून पथदिव्यांची योग्य व्यवस्था करावी. – एन. डी. कुलकर्णी, सेवानिवृत्त बांधकाम अभियंता