Headlines

संभाजीनगरातील ठाकरे स्मारकास 15 कोटी मंजूर:पालकमंत्री शिरसाट यांना दूर ठेवून उपमहापौर जंजाळ यांनी आणला निधी




सिडकोतील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शुक्रवारी स्मारकाच्या कामाची पाहणी केली. स्मारकाची काही कामे अपुरी असल्यामुळे सुशोभीकरणासाठी निधीची आवश्यकता होती. त्यामुळे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या निधीचा शासन निर्णयदेखील निघाला आहे. याबाबत राजेंद्र जंजाळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, “सुशोभीकरणाची कामे अजून बाकी आहेत. त्यामुळे या कामासाठी निधीची आवश्यकता होती. त्यासाठी हा निधी आम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागितला. त्यानुसार निधी मिळाल्यामुळे 23 जानेवारीपूर्वी हे काम पूर्ण केले जाणार आहे. ‘केवळ शहरात आल्यामुळे पालकमंत्री होता येत नाही’ पालकमंत्री बदलाच्या चर्चेबाबत शिरसाट म्हणाले, ‘शहरात आल्यामुळे पालकमंत्री होत नाही. त्यांनी शहरात त्यांच्या विभागांचा आढावा घेतला. मीदेखील इतर शहरांत जाऊन माझ्या विभागाचा आढावा घेतो. त्यामुळे लगेच बदल होत नसतो.’ पालकमंत्री गैरहजर राहिल्यामुळे चर्चा पालकमंत्री शहरात असतानाही स्मारकाला भेट देण्यासाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे पालकमंत्र्यांना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. उदय सामंत हे पालकमंत्री होणार, अशीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे “मी केवळ ऑरिकचा आढावा घेण्यासाठी आलो होतो, याशिवाय दुसरे काहीही नाही,’ असे सामंत यांना स्पष्ट करावे लागले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *