![]()
जंगलाचा राजा असलेल्या वाघाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी २९ जुलैला जगभरात ‘जागतिक व्याघ्र दिन’ साजरा होतो. जगातील ७५ टक्के वाघ भारतात आहेत. महाराष्ट्रात शासनाचे प्रयत्न आणि स्थानिक समुदायाच्या सहभागामुळे वाघांची संख्या ५०० च्या पार गेली आहे.
.
दर वर्षी राज्यात वाघांची संख्या ५ ते ७ टक्क्यांनी वाढत आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र चौथा आहे. तर मध्य प्रदेश (७८५) पहिल्या क्रमांकावर आहे. २०२२ च्या अधिकृत अहवालात राज्यात ४४४ वाघ होते. वन विभागाच्या निरीक्षणानुसार चंद्रपूर आणि विदर्भात वाघांच्या संख्येत दरवर्षी ५ ते ७ टक्क्यांनी वाढ होत आहे.
व्याघ्रसंख्येत अग्रेसर राज्ये मध्य प्रदेश ७८५ कर्नाटक ५६३ उत्तराखंड ५६० महाराष्ट्र ५००
संघर्ष कमी करण्याचे आव्हान
व्याघ्र संवर्धनाला मिळालेले यश हे जनतेच्या सहकार्याचे प्रतीक आहे. मात्र आता सुरक्षित कॉरिडॉर टिकवणे आणि मानव-प्राणी संघर्ष कमी करणे मोठे आव्हान आहे. – किशोर रिठे, वन्यजीव अभ्यासक