.

शहरातील राजापेठ परिसरातील गद्रे चौकातील उड्डाणपुलावर एका बेलगाम ट्रकने काळजाचा थरकाप उडवणारा तांडव घातला. नो एन्ट्री असतानाही नियम धाब्यावर बसवून धावणाऱ्या या ट्रकने एका दुचाकीला धडक देवून २७ वर्षांच्या उच्चशिक्षित तरुणीसह तिच्या मावशीला चिरडले. या अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला. हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात मंगळवारी २८ जुलैला दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास घडला. या घटनेनंतर नागरिकांनी ट्रकचालकावर प्रचंड रोष व्यक्त केला. विशेष म्हणजे, शहरात दुपारी २ ते ४ या वेळेतच जडवाहनांना प्रवेशाची मुभा आहे, मात्र त्यानंतर शहरात जड वाहनांना कायद्याने ‘नो एन्ट्री’असते. तरीही हा ट्रक नो एन्ट्रीत घुसल्याने हा भीषण अपघात झाला.
गौरी प्रमोद धर्माळे (२७, रा. बोरगाव धर्माळे), हर्षा आदेशराव गावंडे (३८, रा. भटवाडी, अमरावती.) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. गौरी ही एम.ई. (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग) द्वितीय वर्षाला शिकत होती. मंगळवारी कामानिमित्त गौरी तिच्या मावशीसह मुख्य बाजारपेठेत आली होती. खरेदी करुन गौरी, तिची मावशी हर्षा या दोघीही दुचाकीने राजापेठ परिसरातील गद्रे चौकातील उड्डाणपुलावरून घरी परतत होत्या. त्याच वेळी मागून आलेल्या ट्रकने गौरीच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोघीही मार्गावर खाली पडल्याने त्या अवजड ट्रकचे मागील चाक दोघींच्याही डोक्यावरून गेले. गौरीने प्रवासादरम्यान सुरक्षेची सर्व खबरदारी घेऊन हेल्मेट परिधान केले होते; परंतु, त्या अनियंत्रित ट्रकच्या अवजड वजनापुढे त्या हेल्मेटचाही चुराडा झाला आणि तेही गौरीचे प्राण वाचवू शकले नाही. अपघाताची वार्ता पसरताच राजापेठपोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळा कडे धाव घेतली. उर्वरित. पान ४ शहरातील राजापेठ ते अंबादेवी मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता प्रवेश द्वाराच्या सौंदर्यीकरणासाठी बंद केल्यामुळे मोनालिसा कॉम्प्लेक्स जवळून पन्नालालनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. एकतर हा मोठा रस्ता नसून, लहान गल्ली आहे. त्यामुळे येथे येणारी व जाणारी वाहने अडतात. राजापेठ उड्डाणपुल नेमका याच ठिकाणाहून सुरू होतो. या रस्त्याने राजापेठकडे जायचे असल्यास पुलाच्या सुरुवातीचा भाग पूर्णपणे ओलांडून जावे लागते. राजापेठ पोलिस ठाण्याकडून मोनालिसा कॉम्प्लेक्स गल्लीकडे येण्यासाठीही धोका पत्करून वाहने वळवावी लागतात. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.
शहरातील राजापेठ ते अंबादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता बंद असल्यामुळे होते वाहतुकीची कोंडी
विवाह करण्याच्या निर्णयाने गौरीला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते! गौरीच्या भविष्याची सुंदर स्वप्ने पाहिली जात होती. गौरीचा विवाह करण्याचा निर्णय तिच्या कुटुंबियांनी घेतला होता आणि तिच्यासाठी उत्तम स्थळ शोधण्यास सुरुवात झाली होती. अगदी आगामी काहीच दिवसांत तिला बघण्यासाठी पाहुणे येणार होते. आयुष्याच्या नव्या प्रवासाची तयारी म्हणून गौरी मावशीसह आनंदाने मार्केटमध्ये काही खरेदी करण्यासाठी गेली होती. मात्र, खरेदी आटोपून घरच्या वाटेने जात असतानाच हा सुसाट सुटलेला टिप्पर गौरी आणि हर्षा या दोघींच्याही आयुष्यासाठी क्रूर काळ बनून आला.
वाहतूक पोलिसांचा धाक संपला का? थेट नो एंट्रीत ट्रक! शहरात जड वाहनांना रात्री १० ते सकाळी ६ दुपारी २ ते ४ याच वेळेत प्रवेशाची मर्यादा असल्याचे राजाापेठ वाहतूक विभागाचे पीआय नीलेश गावंडे यांनी सांगितले. असे नियम असतानाही वाहतूक विभागाच्या कारभारामुळे वेळेव्यतिरिक्तही अवजड वाहने शहरात फेऱ्या मारताना दिसतात. शहरातील वाहतूक व्यवस्था ढासळली आहे. हा ट्रक नो एन्ट्रीमध्ये, ४ वाजून १० मिनिटांनी या पुलावरून जात होता. ट्रकचालकाने केलेल्या नियमांच्या उल्लंघनामुळेच दोन महिलांचा बळी गेला .मागील ११ महिन्यांपासून शहरातील रेल्वे स्टेशन ते राजकमल हा मुख्य पुल वाहतुकीसाठी बंद केला आहे. तो पुल धोकादायक झाल्याचा ठपका ठेवून तोडला आहे. ११ महिन्यात हा पुल तोडला आहे. त्याचे बांधकाम कधी होईल, वाहतूकीसाठी कधी सुरू कधी येईल, हा प्रश्न कायम आहे. हा पूल बंद झाल्यामुळे जयस्तंभ चौक ते इर्विन चौक या मार्गावर वाहतूक कोंडी होते.