Headlines

घरगुती वाद सोडवण्याच्या रागातून‎मुलाने केली वृद्ध वडिलांची हत्या‎:चिंचवण येथील घटना, मुलाने दुचाकी नेल्याने आरोपी करीत होता पत्नीला मारहाण‎




मुलाने दुचाकी नेल्यामुळे त्याच्या संतप्त‎वडिलाने स्वतःच्या पत्नीला शिवीगाळ‎करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.‎या वेळी वाद सोडवण्यासाठी वृद्धाने‎मध्यस्थी केली. याचा राग आल्याने‎डोक्यात व चेहऱ्यावर विटांनी मारहाण‎करून पोटच्या मुलानेच वृद्ध पित्याची हत्या‎केल्याची घटना वडवणी तालुक्यातील‎चिंचवण येथे २७ जुलै रोजी घडली.‎श्रीकिसन भागोजी कोठुळे (७०, रा.‎चिंचवण) असे मृत वृद्धाचे नाव असून,‎फुलचंद श्रीकिसन कोठुळे असे गुन्हा‎दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव‎आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎शुभम फुलचंद कोठुळे (२०) याने‎नोंदवलेल्या तक्रारीनुसार शुभमने काही‎महिन्यांपूर्वी वडवणी येथील अमोल उजगरे‎याच्याकडून २० हजार रुपये हातउसने‎घेतले होते. २७ जुलै २०२६ रोजी‎संध्याकाळी अमोलच्या मागणीवरून‎शुभम त्याच्याशी बोलण्यासाठी व दुचाकी‎ याप्रकरणी नातू शुभम कोठुळे याच्या‎फिर्यादीवरून फुलचंद कोठुळे‎याच्याविरोधात वडवणी पोलिस‎ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल‎करण्यात आला आहे. पोलिस‎निरीक्षक वर्षा व्हागडे यांच्या‎मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील‎तपास सुरू आहे. फुलचंद कोठुळे ‎याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.‎ घटनेनंतर नातेवाइकांनी व‎ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या‎ श्रीकिसन यांना तात्काळ चिंचवण‎येथील शासकीय रुग्णालयात नेले.‎तेथून पुढील उपचारासाठी‎रुग्णवाहिकेने बीड येथील शासकीय‎रुग्णालयात दाखल करण्यात आले.‎मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी‎श्रीकिसन कोठुळे यांना तपासून मृत‎घोषित केले.‎ वडिलांच्या खुनाची आठवड्यात दुसरी घटना वडिलांच्या खुनाची‎ही या आठवड्यातील जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. १८ जुलै रोजी गेवराई येथील‎ईसाक शेख यांचा मुलगा शौकत शेख यानेही अशाच प्रकारे पैशांच्या वादातून बेदम‎मारहाण केली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‎ देण्यासाठी घरच्यांना न सांगता‎तेलगाव येथे गेला होता. शुभम‎दुचाकी घेऊन गेल्याचे कळताच‎त्याचे वडील, आरोपी फुलचंद, याने‎घरात पत्नी व लहान मुलाला‎शिवीगाळ करत मारहाण करण्यास‎सुरुवात केली. “तुम्ही माझी दुचाकी‎शुभमला का नेऊ दिली?” असे‎म्हणत तो कौटुंबिक वाद घालत होता.‎दरम्यान, याप्रकरणी वडवणी‎पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात‎आला आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *