![]()
भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या सचिव वंदनाताई मुखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय मुखेकर यांच्या प्रेरणेतून म्हारोळा येथील श्री मोहटादेवी विद्यालय व कै विठ्ठलराव धरपळे कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. अशोकराव मुखेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी काही निवडक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यांनी गुरूंचे जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच काही विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी मृदंगाचा तालावर गीत गायन केले, तर इ. ७ वी च्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात आनंदमय सहभाग नोंदवला.
Source link
गुरुपौर्णिमा:श्री मोहटादेवी विद्यालय येथे गुरुपौर्णिमा साजरी