![]()
वर्गात दोन मुलांमध्ये झालेल्याभांडणाची शहानिशा न करता,रागाच्या भरात शाळेच्यामुख्याध्यापकाने एका आठ वर्षीयविद्यार्थ्याला अमानुष मारहाणकेल्याचा प्रकार एका शाळेतघडला. मुख्याध्यापकानेविद्यार्थ्याचा कान पिरगाळून त्याचागळा दाबला आणि त्याला हवेतउचलून त्याच्या उजव्या हाताचाचावा घेतला. या प्रकरणीअहिल्यानगर तालुका पोलिसठाण्यात संबंधित मुख्याध्यापकावरगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्याआईने पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी वाळुंज येथील नालंदास्कूलचे मुख्याध्यापक गौतमबहादुर्गे (पूर्ण नाव माहीत नाही)याच्याविरुद्ध मध्यरात्री गुन्हा दाखलकेला. गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंतकारावासाची शिक्षा या गुन्ह्यात बाल न्याय (मुलांचीकाळजी व संरक्षण) अधिनियम२०१५ चे कलम ७५ लावण्यात आलेआहे. हे कलम लहान मुलांवरीलक्रूरतेबाबतच्या गुन्ह्यासाठी आहे.जेव्हा मुलाचा प्रत्यक्ष ताबा असलेलीकिंवा मुलावर कायदेशीर नियंत्रणअसलेली कोणतीही व्यक्ती(शिक्षक, मुख्याध्यापक किंवाकाळजीवाहू) त्या मुलाला मारहाणकरते, छळ करते, तेव्हा याकलमांतर्गत गुन्हा दाखल होतो. यागंभीर गुन्ह्यासाठी दोषीला तीनवर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षाकिंवा एक लाखापर्यंत दंड किंवा यादोन्ही शिक्षा देण्याची तरतूद आहे.
Source link
मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याचा गळा दाबून घेतला चावा:नालंदा स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर घडली घटना