Headlines

नेवासेत कामिका एकादशी यात्रेची तयारी:दिंड्यांची नोंदणी




कामिका एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभागांनी सतर्क राहून मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले. ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कामिका एकादशी यात्रेच्या नियोजनासाठी संत ज्ञानेश्वर मंदिर परिसरात मंदिर विश्वस्त मंडळ, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पत्रकार, सेवेकरी व दिंडी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली.या यात्रेसाठी परिसरातून सुमारे अडीचशे दिंड्या सहभागी होतात. वाढत्या भाविक संख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षा व आपत्कालीन सुविधा याबाबत सविस्तर नियोजन करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या. बैठकीस मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त हभप देविदास महाराज म्हस्के, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, तहसीलदार संजय बिरादार, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर झावरे उपस्थित होते. सर्व सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश आमदार लंघे यांनी दिले. यावर्षी गर्दीचा विचार करून पहाटेच्या अभिषेकानंतर पैस खांबाचे दर्शन प्रवेशद्वारा बाहेरूनच देण्यात येणार आहे. प्रवेशद्वारात चांदीच्या मूर्ती व पादुका ठेवण्यात येणार असून मंदिराच्या सभागृहात तसेच गोल पायऱ्यांच्या परिसरातही पायऱ्यांवर स्वतंत्र पादुका दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व अडीचशे दिंड्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *