केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भाजप नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करत त्यांचे
.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते विजय चौधरी यांच्या नावाशी संबंधित अनेक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील एका चर्चित क्लिपमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील संभाषण असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाषणात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल तसेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप आहे. या क्लिपमध्ये शिवीगाळही ऐकू येत असल्याचा दावा केला जात असून, त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच दरम्यान विजय चौधरी यांच्या आणखी काही कथित ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर समोर आल्या आहेत. एका क्लिपमध्ये माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यासोबतचे संभाषण असल्याचा दावा करण्यात आला असून त्यात पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
पीएवर डेटा कॉपी केल्याचा संशय
या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरी यांच्या मुलाने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान स्वीय सहाय्यक यश टिपरे याने विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा पेन ड्राइव्हमध्ये कॉपी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
व्हायरल क्लिपची साखळी शोधण्याचा तपास
या कथित ऑडिओ क्लिप नेमक्या कोणाकडून आणि किती जणांना पाठविण्यात आल्या, त्या सोशल मीडियावर कशा व्हायरल झाल्या आणि त्यामागे नेमके कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. व्हायरल क्लिपच्या प्रसारामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.
कठोर कारवाईचा इशारा
या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या किंवा त्याच्या प्रसारात सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नंदुरबार पोलिसांनी दिला आहे. तपासात पुढे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा..
रक्षा खडसेंचा राजीनामा घ्या, दुहेरी भूमिका चालणार नाही!:विजय चौधरी-गिरीश महाजनांच्या कथित ऑडिओ क्लिपने राजकीय भूकंप; खडसे-रोहित पवारांची टीका

भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एका कथित ऑडिओ क्लिपने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या क्लिपमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सूनबाई व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याचे ऐकू येत असून, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करण्यात आली आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून संतापाची लाट उसळली असून, भाजपमधील अंतर्गत गटबाजी व खडसे-महाजन यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या ऑडिओ क्लिपनंतर वाढता विरोध आणि पक्षाची बदनामी टाळण्यासाठी विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी