Headlines

विदर्भातून ओबीसींचा एल्गार:'मंडल जनगणना यात्रा' आज भंडाऱ्यातून निघणार; वडेट्टीवार सहभागी, तर पटोलेंची दांडी




जातनिहाय जनगणना तातडीने करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे आणि ओबीसी समाजाला हक्काचे बजेट मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी आज (3 ऑगस्ट) भंडाऱ्यातून ‘मंडल जनगणना यात्रा’ सुरू होत आहे. सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही यात्रा विदर्भातील 11 जिल्ह्यांचा दौरा करून 9 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे समारोप होणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार सहभागी होणार आहेत. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भंडाऱ्याचे भूमिपुत्र नाना पटोले यात्रेत सहभागी होणार नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांतून प्रवास ओबीसी समाजाला एकत्र आणणे आणि सरकारविरोधात जनप्रबोधन करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. भंडाऱ्यातून सुरू होणारी ही यात्रा नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर ग्रामीण, गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील ११ जिल्ह्यांतून प्रवास करेल. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. सकल ओबीसी महामोर्चाने दावा केला आहे की, जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजाचे दरवर्षी तब्बल 15 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची अधिकृत नोंद करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. भंडाऱ्यातून सुरू होणारी ही यात्रा नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर ग्रामीण, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांतून प्रवास करत ९ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे पोहोचणार आहे. या माध्यमातून ओबीसी समाजाला एकत्र आणणे, त्यांच्या प्रश्नांबाबत जनजागृती करणे आणि सरकारवर दबाव वाढवणे हा यात्रेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. यात्रेतील प्रमुख मागण्या काय आहेत? मंडल यात्रेच्या माध्यमातून सकल ओबीसी महामोर्चाने खालील प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. या यात्रेच्या निमित्ताने विदर्भाच्या राजकारणात एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे स्वतः या यात्रेत सहभागी होण्यासाठी भंडाऱ्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे यात्रेला मोठे बळ मिळाले आहे. मात्र, दुसरीकडे भंडाऱ्याचे भूमिपुत्र आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी या यात्रेकडे पाठ फिरवली आहे. ते या यात्रेत सहभागी होणार नसल्याने राजकीय वर्तुळात आणि स्थानिक ओबीसी बांधवांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. आता ही मंडल जनगणना यात्रा विदर्भातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात काय बदल घडवून आणते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा.. प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र:पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या जमा होणार 7 हजार कोटी राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेसाठी सहकार विभागाने केलेल्या डेटा पडताळणीत तब्बल 94,083 शेतकरी ‘आयकरदाते’ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी अपात्र ठरले असून यामुळे राज्य सरकारचे तब्बल 1,881 कोटी 66 लाख रुपये वाचले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *