अमित शहा यांनी दहशतवाद आणि नक्षलवाद संपवला पण संजय राऊत हे अर्बन नक्षली आहेत म्हणून ते शहा यांना विरोध करत आहे. पण अमित शहा यांना जनतेने निवडून दिले आहे, 140 कोटी जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी आहेत तुमच्या सारख्या लोकांनी राजीनामा मागितल्याने काही
.
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा कुठे आहेत असा सवाल करत आहेत. पण त्यांचा पक्ष हरवला आहे, महाराष्ट्रातून तुमचा पक्ष गायब झाला आहे त्याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम जनतेमध्ये असतात. शहा तर तुमच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्रात येऊन गेले. नरेंद्र मोदी हे आंध्र प्रदेशमध्ये लाखो लोकांशी संवाद साधून गेले. उद्धव ठाकरे कुठे आहेत याचे उत्तर राऊत यांनी दिले पाहिजे. महाराष्ट्रातून उबाठा गायब झाला आहे, तुमचे अस्तित्च संपले आहे त्याकडे लक्ष द्या.
राऊतांनी पक्ष शोधणं गरजेचे
नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ सोशल मिडीयावर नाही तर जनतेमध्ये जाणारे आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केवळ अडीच दिवस मंत्रालयात आले होते. ते घरात बसून सर्व कारभार करत होते. पंतप्रधान सोशल मिडीयावर जेन झीशी बोलतात आणि आंध प्रदेशमध्ये जात लोकांशी संवादही साधतात. तुम्ही अमित शहा कुठे हे विचारण्यापेक्षा तुमचा पक्ष कुठे आहे हे शोधणं गरजेचे आहे.
शहांचा राजीनाम मागण्याचे कारण काय?
नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ना संसदेला घाबरतात ना संजय राऊत यांच्यासारख्या विरोधकांना सुत्रा घाबरत नाहीत. ते जेव्हा संसदेत बोलायला उभे राहतात त्यावेळी सर्व विरोधकांना भारी पडतात. पंतप्रधान संसदेत येतील त्यावेळी इंडिया आघाडीचर पळता भुई थोडी होईल. अमित शहा यांचा राजीनाम मागण्याचे कारण काय आहे? त्यांनी कलम 370 हटवले म्हणून की, ते दशतवाद्यांचा खात्मा करतात म्हणून? की बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व जिंवत ठेवले म्हणून राऊतांकडून शहांचा राजीनामा मागितला जात आहे? असा सवाल बन यांनी केला आहे.
मातोश्रीवर बसून कोणी सरकार चालवले?
नवनाथ बन म्हणाले की,अडीच वर्षे मविआचे सरकार असताना घरात बसून फेसबूक लाईव्ह कोण करत होते? मातोश्रीवर बसून सरकार कोण चालवत होते? पंतप्रधान जनतेशी संवाद साधत असतात. उद्धव ठाकरे मातोश्रीमधून बाहेर पडतात का? घरबशा माजी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू नये.
हे ही वृत्त वाचा
पंतप्रधान अन् गृहमंत्री हरवले:मोदी-शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते संसदेत यायला घाबरतात का?, संजय राऊतांचा सवाल

आम्ही सर्वांनी ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत अशी जाहिरात द्यायची.संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास घाबरत आहेत का? जर संसद चालवायचीच नव्हती, तर संसदेची नवीन इमारत कशासाठी उभारली? त्यांनी सोशल मीडियावरच संसद चालवावी, असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे. वाचा सविस्तर