Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:जायकवाडी भरल्याने दिलासा; 25 टीएमसी भरल्यानंतरच उघडणार मुळा धरणाचे दरवाजे




यंदा “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर धरणे भरणार की नाही याची धाकधूक लागली होती. पण जायकवाडी ९१ टक्क्यांवर गेल्याने धरणातून विसर्ग सुरू झाला आणि अहिल्यानगरला दिलासा मिळाला. धरण साठा नियंत्रण निकषानुसार, १५ ऑगस्टपर्यंत मुळा धरणात ८७.७९ टक्के म्हणजेच सुमारे २२ हजार ६८६ दलघफू (२२.६ टीएमसी) पाणी साठवता येणार नाही. सध्याची आवक पाहता धरण पुढील दोन दिवसांत ओलांडणार आहे. अशा स्थितीत धरणातील पाणी नदीपात्रात न सोडता “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर २५ टीएमसी झाल्यानंतरच पाणी सोडण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले. जायकवाडीचा जिवंत साठा ६५ टक्क्यांवर गेला नसता तर या निकषानुसार पाणी सोडणे बंधनकारक होते. मागील वर्षी (२०२५) मुळा धरण २४ जुलैला ओव्हरफ्लो झाले होते. मुळा धरणाचा सध्याचा साठा ८१ टक्क्यांवर पोहोचला असून, वाढीचा वेग कायम राहिल्यास पुढील दोन ते तीन दिवसांत परिचालन सूचीत नमूद केलेली ८७.७९ टक्क्यांची पातळी गाठण्याची शक्यता आहे. नियमानुसार या पातळीपेक्षा अधिक पाणी साठवता येत नसल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. जायकवाडी धरण भरलेले असल्याने तेथे पाणी सोडण्याचा दबाव नाही. त्यातच ऑगस्टमध्ये पावसाने खंड पडण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जायकवाडी भरल्यामुळे ” समन्यायी’ धोरणानुसार विसर्ग करण्याची आवश्यकता निर्माण होण्याची शक्यता कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुळा विभागाकडून पावसाच्या खंडाचा विचार करून धरणातील पाणी २५ टीएमसीपर्यंत साठवून ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. सूचीची अंमलबजावणी करू ^ सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. आवकदेखील कमी झाली आहे. कुठल्याही स्थितीत आम्ही धरण परिचालन सूचीची पूर्णपणे अंमलबजावणी करणार आहोत. – सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा विभाग. उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा ऑगस्टमध्ये “एल निनो’चा प्रभाव वाढण्याची धास्ती आहे. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. अशा परिस्थितीत धरण परिचालन सूचीनुसार, जलसाठा नियंत्रित करण्याचे निर्देश असतील, तर मुळा विभागाने २५ टीएमसीपर्यंत साठा करण्याचा विचार करणे योग्य आहे. भविष्यात पाऊस कमी झाला तर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता कमी राहू शकते. जायकवाडीत यंदा पाणी सोडण्याचा दबाव नसल्याने मुळा धरणातील उपलब्ध पाणी जास्तीत जास्त साठवून ठेवणे योग्य ठरेल. यामुळे भविष्यातील पाणी उपलब्धतेची शाश्वती वाढेल. कालावधी जलसाठा(टीएमसी) टक्केवारी १ ते १५ जून १६ ६२.८ १६ ते ३० जून १६.१ ६२.२९ १ ते १५ जुलै १८.१ ६९.८३ १६ ते ३१ जुलै २१.८ ८३.९१ १ ते १५ ऑगस्ट २२.८ ८७.७९ १६ ते ३१ ऑगस्ट २४.८ ९५.७१ (स्रोत : जलसंपदा विभागाची धरण परिचालन सूची)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *