Headlines

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंचे पदग्रहण:डॉ. व्यंकट गिते यांनी सूत्रे स्वीकारली; संशोधन आधारित उपक्रम व विद्यार्थी-केंद्री शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्धार




आरोग्य शिक्षणात संशोधनावर आधारित उपक्रम, पारदर्शक प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थी-केंद्री कामांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांनी केले. विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात त्यांनी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली. कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी विद्यापीठाचा मानदंड नवनियुक्त कुलगुरुंकडे सुपूर्द करून कार्यक्रमाची सुरुवात केली. याप्रसंगी व्यासपीठावर कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांच्यासोबत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सचिन मुंबरे, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. यशवंत पाटील, डॉ. अजित फुंदे, डॉ. श्रीचक्रधर मुंघल, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील आणि डॉ. अनिता गिते उपस्थित होते. विद्यार्थी-केंद्री उपक्रम आणि पारदर्शक प्रशासन पदग्रहणानंतर बोलताना डॉ. व्यंकट गिते म्हणाले की, विद्यार्थी हा विद्यापीठाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान आधारित शिक्षण प्रणालीचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव दिला जाईल. तसेच विद्यापीठात समाजोपयोगी संशोधन होण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद सुकर व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना विशेष संवाद कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. ‘नॅक’च्या धर्तीवर शैक्षणिक गुणवत्ता सुधारून आंतरराष्ट्रीय मानांकनात पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थी आणि प्रशासकीय कामकाजासाठी खालील प्रमुख उपक्रम राबवण्याची घोषणा त्यांनी केली गुरुजन आणि कुटुंबाचा विशेष सत्कार समारंभात कुलगुरुंच्या मातोश्री शाहूबाई अर्जुनराव गिते, पत्नी डॉ. अनिता गिते आणि बंधू भास्कर गिते यांचा विद्यापीठाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यासोबतच डॉ. व्यंकट गिते यांना घडवणाऱ्या त्यांच्या आदरणीय शिक्षकांचा व गुरुजनांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. पुरुषोत्तम दराख, डॉ. श्रीराम कंडी, डॉ. अनुराधा कंडी, डॉ. जे.एस. कंडी, डॉ. मलीक, डॉ. गौरांग शहा, डॉ. पळनीटकर, डॉ. एन.डी. कुलकर्णी, डॉ. पंकज माहेश्वरी, डॉ. प्रविण कुमार वसाडीकर, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अजय बोराळकर, डॉ. किरण पाटोळे, डॉ. स्वप्नाली कदम, डॉ. गणेश जाधव, डॉ. सचिन देवरे, डॉ. अनिल सानप आणि डॉ. अशोक थोरात यांचा समावेश होता. या कार्यक्रमात नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, मुख्यमंत्री सचिव विजय उकलगावकर, उद्योगमंत्री सचिव डॉ. प्रशांत रुमाले, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिकारी आणि मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून नवनियुक्त कुलगुरुंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले, तर आभार डॉ. देवेंद्र पाटील यांनी मानले. या सोहळ्याला शैक्षणिक, वैद्यकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *