Headlines

एफडीए प्रयोगशाळा 10 ते 6 नव्हे, 24तास कार्यरत राहणारी यंत्रणा:नियमानुसार काम जमत नसेल तर राजीनामाद्या, संभाजीनगरच्या कर्मचाऱ्यांना मुंढेंचा दम




अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या विरोधात तक्रार करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रयोगशाळेतील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. “प्रयोगशाळा ही सकाळी १० ते ६ या वेळेत चालणारे सामान्य कार्यालय नसून २४ तास कार्यरत राहणारी अत्यावश्यक यंत्रणा आहे. शासकीय नियमांनुसार काम करायचे नसेल तर कर्मचारी राजीनामा देऊन जाण्यास मोकळे आहेत,” अशा कडक शब्दांत आयुक्तांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती संभाजीनगर प्रयोगशाळेतील २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दोन शिफ्टमध्ये काम करणे, ताणाबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे १५ जुलै रोजी निवेदनाद्वारे तक्रार केली होती. गुटखा तस्करीवर करडी नजर, धडक कारवाया अपील व फेरतपासणीस गती: परवाने निलंबित आस्थापनांना दिलासा देताना आयुक्त म्हणाले, आस्थापनांचा फेरतपासणी अहवाल प्राप्त होताच जलद सुनावणी घेऊन अंतरिम स्थगितीची प्रक्रिया सुरू केली. रेल्वे तथा लहान वाहनांमार्फत होणाऱ्या बेकायदा गुटखा वाहतुकीवर एफडीएची करडी नजर आहे. राज्यभर तस्करीविरोधात धाडसत्रे,कारवाया तीव्र केल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *