![]()
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी १२ तासांत भूकंपाचे ६ धक्के बसले. यातील ४ धक्क्यांचे केंद्र सुरगाणा तालुक्यातील करंजाळी-उंबरठाण परिसरात होते, तर पहिल्या धक्क्याचे केंद्र नाशिक शहराच्या ईशान्येकडील भागात नोंदवण्यात आले. दरम्यान, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि पेठ या तालुक्यांत चार भूकंपमापक यंत्र बसवण्यात येत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्र गुजरात सीमेवरील गावांत जाणवणाऱ्या या धक्क्यांच्या नोंदी या यंत्रांद्वारे राष्ट्रीय विज्ञान केंद्र घेणार आहे. देशभरात असे १७४ महाराष्ट्रात १६ यंत्र आहेत. १०,००० किमी अंतरावरील भूकंपाची नोंद घेण्याची क्षमता या अद्ययावत यंत्रांमध्ये आहेत. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र, लागोपाठ बसलेल्या दोन धक्क्यांमुळे लोक घराबाहेर धावले. विभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी नागरिकांना न घाबरता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ७ जुलैच्या मुसळधार पावसामुळे खडकाच्या भेगांतून पाण्याचा दाब
Source link
केंद्रबिंदू ईशान्येकडे:नाशकात 12 तासांत 6 भूकंप, मुसळधार पावसामुळे खडकांच्या भेगांत पाणी झिरपले