Headlines

महामार्गाच्या जमिनीत झालेला घोटाळा लपवण्यासाठीच विनाकारण त्रास:माळेगावच्या वाईनशॉप मालकाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आरोप




कळमनुरी तालुक्यातील माळेगाव शिवारातील वाईनशॉप प्रकरणात राष्ट्रीय महामार्गाकडून विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने पत्र व्यवहार केल्या जात असल्याचा आरोप बाळकृष्ण पब्बावार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे. कळमनुरी तालुक्यातील माळेगाव शिवारातील बाळकृष्णा पब्बावार यांची जागा संपादीत करण्यात आली. त्यानुसार या जागेचा सुमारे 46 लाख रुपयांचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला. मात्र जागा संपादीत केल्यानंतरही काही जागा त्यांनी राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत केलीच नसल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे प्रकल्प संचालक महेश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे दिले आहे. या शिवाय या शिवारातच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे कुठल्याही प्रकारचे ना हरकत न घेताच वाईनशॉप सुरु करण्यात आले असल्याचे नमुद केले आहे. त्यावरून उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र देऊन आवश्‍यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाईनशॉप शासनाच्या परवानगीनेच सुरू या प्रकरणात बाळकृष्ण पब्बावार यांनी दिलेल्या प्रसिद्दीपत्रकानुसार माळेगाव येथील गट क्रमांक 10 मधील अधिग्रहण झालेल्या जागेबाबत जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात वादविवाद प्रलंबित आहे. राष्ट्रीय महामार्गाकडून हेतुपुरस्सर त्रास देण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने सदर पत्र योग्यत्या कार्यवाहीस्तवर पाठविले आहे. सदर वाईनशॉप शासनाच्या परवानगीनेच सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सदर वाईनशॉप बेकायदेशीर नसून राष्ट्रीय महामार्गाच्या जमीनीत झालेला घोटाळा लपविण्याच्या उद्देशानेच त्यांनी हे पत्र पाठविल्याचा आरोप पब्बावार यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *