Headlines

डिलिमिटेशनच्या नावाखाली भाजपचा विधानसभा-लोकसभा फोडण्याचा प्लॅन:आमच्या पक्षाचे खासदार विरोधात मतदान करतील- रोहित पवार




मी कधीही माझी राजकीय भूमिका बदलत नाही आणि माझ्या भूमिकेबाबत कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी ती काढून टाकावी. डिलिमिटेशनच्या बिलावर 50 टक्के किंवा इतर काहीही असो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार या बिलाच्या विरोधातच मतदान करतील. डिलिमिटेशन हे केवळ एक नाव असून, वॉर्ड आणि प्रभागांसारख्या सीमा फोडून विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ फोडण्याचे काम यातून केले जात आहे. असे झाल्यास देशात लोकशाही टिकणार नाही आणि भाजप यावर 2016 पासून काम करत आहे, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करताना ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केला होता. पूर्वी इंदिरा गांधी यांनाही अशाच शब्दांत हिणवले गेले होते, पण त्यांनी या टीकेला शब्दांनी नाही तर आपल्या कृतीतून उत्तर दिले होते असे सपकाळ यांनी म्हटले होते. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आहे, तनतेच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांनी टीकेला कामातून उत्तर दिले पाहिजे. धाडसी निर्णय घेत त्यांनी हे दाखवून दिले पाहिजे. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांना बोलू देत नाहीत की काय, हे समजत नाही. त्यांच्या पक्षाचे नेते पत्रकारांचा आवाज दाबतात, ते स्वत:च पक्षाचे अध्यक्ष आहेत असे वागतात. बिल सादर होईल त्या दिवशी कोण कुठे हे स्पष्ट होईल डिलिमिटेशन बिलाबाबत बोलताना रोहित पवार पुढे म्हणाले की, येत्या 17 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. ज्या दिवशी हे बिल संसदेत सादर होईल, त्या दिवशी कोण विरोधात मतदान करते आणि कोण अचानक गायब होते, हे स्पष्ट होईल. आमचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मतदारसंघातील विकासकामे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही भेट होणार असून, पंतप्रधानांची वेळ मिळणे सोपे नसते. त्यामुळे या भेटीचा आणि बिलावरील मतदानाचा वेगळा अर्थ काढू नये; मतदानाच्या दिवशीच सर्वांचे पत्ते उघड होतील. हे ही वृत्त वाचा

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपचा संवैधानिक ढाचा उद्ध्वस्त करण्याचा डाव:नाना पटोले यांचा भाजप अन् मोदी सरकारवर गंभीर आरोप
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डिलिमिटेशनच्या नावाखाली देशातील घटनात्मक आणि संवैधानिक व्यवस्थेला तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी महिला आरक्षणाचा वापर केवळ एक ढाल म्हणून केला जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *