Headlines

‘एक वृक्ष एक जीवन’ अभियानांतर्गत 450 वृक्षांचे रोपण:नागरिकांकडून पर्यावरण संवर्धनाचा महायज्ञ, ठिकठिकाणी वृक्षारोपण‎



देशभरात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित क्रांतीला गती देण्यासाठी दैनिक भास्कर समूहाच्यावतीने तब्बल ७५ लाख वृक्षारोपणाचा भव्य संकल्प केला आहे. याच सामाजिक कटिबद्धतेचा भाग म्हणून दैनिक ‘दिव्य मराठी’तर्फे राज्यभर ‘एक वृक्ष एक जीवन’ हे विशेष पर्यावर

.

या अभियानांतर्गत रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी, तालुक्यातील सर्व प्रमुख सामाजिक संघटना आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमगाव डाकू यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेच्या आवारात व परिसरात २५ देशी वृक्षांची लागवड अत्यंत उत्साहात करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ केवळ शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातही वेगाने पसरली आहे. शिंदे (ता. कर्जत) येथे ग्रामस्थ आणि सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत शुक्रवारी तब्बल ४०० देशी वृक्षांचे भव्य रोपण केले. तर दुसरीकडे, कापरेवाडी येथेही ग्रामस्थांच्या आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ५१ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच हातात खुरपी आणि रोपे घेऊन या अभियानात आपला खारीचा वाटा उचलला. झाडे लावा, झाडे जगवा, असा केवळ संदेश न देता प्रत्यक्षात कृती करत कर्जत तालुक्याने निसर्गरक्षणाचा वस्तुपाठच घालून दिला आहे. दिव्य मराठीच्या या अभियानामुळे संपूर्ण तालुक्यात पर्यावरणाविषयी एक नवी जाणीव आणि प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपणाच्या उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनास मोठा हातभार लागला आहे. या अभियानात शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे दिसून आले.

देशी वृक्षांची लागवड व संगोपनाचा संकल्प या अभियानात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, आवळा आणि उंबर यांसारख्या निसर्गपूरक व ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ रोपे लावून न थांबता, प्रत्येक वृक्षाला ‘ट्री गार्ड’ लावून त्याच्या नियमित पाण्यासह तीन वर्षे पूर्ण संगोपनाची आणि ते जगवण्याची ठोस जबाबदारी स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आनंदाने स्वीकारली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *