उद्धव ठाकरेंना त्यांचे स्वतःचे खासदार त्यांना सोडून का गेले हे अद्याप समजलेले नाही आणि येणाऱ्या काळात ‘इंडिया’ आघाडीतील अनेक पक्ष त्यांची साथ सोडतील, कारण ते सातत्याने देशविरोधी भूमिका घेत आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म
.
नाशिकच्या कुंभमेळ्यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, नाशिकचा कुंभमेळा अतिशय भव्य आणि चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाज एकत्र येणार असल्यानेच संजय राऊत यांचे पोट दुखत आहे. राऊत यांना हिंदू समाज एकत्र आलेला चालत नाही, त्यांना औरंगजेबाची पिलावळ एकत्र आलेली चालते. इस्तेमासाठी हजारो लोक एकत्र आले असते, तर राऊतांनी त्यांचे स्वागत केले असते. मात्र, कुंभमेळ्यासाठी हिंदू एकत्र येत असल्यामुळे ते या सोहळ्याची बदनामी करत आहेत.
‘मोदी-शहा ांना सल्ला देण्याऐवजी बाळासाहेबांच्या विचारांचे पारायण करा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कोणाचे पारायण करावे, याचा सल्ला संजय राऊतांनी देऊ नये, असे सांगत बन म्हणाले, तुम्ही स्वतः बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची पारायणे करण्याचे सोडून ‘औरंगजेब फॅन क्लब’ची पारायणे करत आहात. तुम्हाला हिंदुत्वापेक्षा औरंगजेबाचे विचार अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत. ज्या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे घरात बसून कारभार केला आणि केवळ फेसबूक लाईव्हवरून ‘कोमट पाणी प्या’ असा सल्ला दिला, त्यांना आधी संसदेच्या परंपरा शिकवा.
उबाठा गट संपवणारे तुम्ही संपत राऊत आहात
नाशिकमधील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने युद्धपातळीवर सुरू असल्याचे स्पष्ट करत बन यांनी संजय राऊतांवर वैयक्तिक टीका केली. तुम्ही चंपत राय यांचे नाव पुन्हा पुन्हा काय घेत आहात? तुम्ही तर उबाठा गट संपवणारे ‘संपत राऊत’ आहात. उबाठा गट पूर्णपणे संपवण्याची सुपारी तुम्हीच घेतली आहे, हे आता महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, हे जनतेने आधीच सिद्ध केले आहे, असेही नवनाथ बन यांनी ठणकावून सांगितले. हे ही वृत्त वाचा संविधान आणि सुप्रीम कोर्ट पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे:मूळ पक्ष उद्धव ठाकरेंचाच, आम्हाला नक्की न्याय मिळेल- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाच्या खासदारांना दिलेल्या भेटीवरून आणि देशातील सद्यस्थितीवरून शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी संसदेत येत नाहीत, मात्र त्यांनी गद्दारांसाठी दिल्लीत कॅटरिंग उघडली आहे, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या पंतप्रधानांकडील भेटीच्या वेळेबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे. वाचा सविस्तर