Headlines

हिंगोली जिल्ह्यात पोलिस दलाकडून मिशन ऊर्जा उपक्रम:शाळा, महाविद्यालयांमधून महत्वाच्या क्रमांकाबाबत जनजागृती करणार- पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा




हिंगोली जिल्ह्यात मिशन ऊर्जा हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यामध्ये शाळा, महाविद्यालयातून महत्वाच्या क्रमांकाबाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी सोमवारी ता. 10 पत्रकार परिषदेत दिली आहे. येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस पोलिस अधिक्षक लोढा यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत आरसेवार यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस अधिक्षक लोढा यांनी सांगितले की, सायबर सुरक्षा, रस्ते अपघात, महिलांची सुरक्षा याबाबींना प्राधान्य देऊन हा उपक्रम राबविला जाणार आहे. सायबर क्रमांक साठी 1930, आपत्कालीन क्रमांकासाठी 112 तर चाईल्ड हेल्पलाईनसाठी 1098 हेल्पलाईन क्रमांक सुरु आहेत. या क्रमांकाची जिल्ह्यात आतापर्यंत 450 शाळांमधून 30 ते 35 हजार विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे. या शिवाय चित्ररंगवा स्पर्धा घेण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र पालकांकडून रंगवून घेण्यात आले आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील पालकांनाही या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती मिळाली आहे. या शिवाय मंगळवारी ता. 11 सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषद बहुविध प्रशालेच्या मैदानावर विद्यार्थ्यांची रॅली काढली जाणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेली रॅली सकाळी आकरा वाजता संत नामदेव पोलिस कवायत मैदाना येथे विसर्जीत होईल. त्या ठिकाणी मिशन ऊर्जा जनजागृतीपर कार्यक्रमाचे उदघाटन होईल. यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवळ, खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नितीन तडस, शिक्षणाधिकारी विपुल भागवत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांची उपस्थिती राहणार आहे. या शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधून जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले जाईल. त्यानंतर जिल्हयातील आठवडी बाजारात विद्यार्थी पथनाट्य सादर करून या उपक्रमाची जनजागृती करणार असल्याचे पोलिस अधिक्षक लोढा यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *