Headlines

आरोग्य, स्वच्छता, मूलभूत सुविधेचे अधिकाऱ्यांना काम करण्याचे निर्देश:आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी‎




आरोग्य सेवा, स्वच्छता, बांधकाम तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत तातडीने काम करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील विविध विकासकामे प्रत्यक्ष जागेवर जाऊन आयुक्तांनी मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार तसेच चमननगर परिसराची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सुचनाही त्यांनी केली. आयुक्तांनी सर्वप्रथम मोदी हॉस्पिटल येथे भेट देऊन रुग्णालयाच्या विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी दवाखान्यातील कार्यपद्धती, रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची स्थिती, उपलब्ध औषधसाठा तसेच आवश्यक असलेल्या औषधांची माहिती जाणून घेतली. तसेच दवाखान्यात उपलब्ध असलेल्या कर्मचारी वर्गाची माहिती घेऊन सध्याच्या कामकाजाच्या तुलनेत आणखी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे, याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांना वेळेत आणि आवश्यक त्या सुविधा मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगून उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाचा योग्य वापर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, आरोग्य सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना समाधानकारक सेवा मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. अकोली वळण रस्ता चमननगर परिसराची पाहणी केली. अकोली वळण रस्ता चमननगर परिसरातून जात असल्याने या भागातील नागरिकांच्या सुविधा आणि नागरी समस्यांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. महानगरपालिकेच्या वतीने चमननगर येथील नागरिकांना देण्यात आलेल्या भूखंडांची आयुक्तांनी पाहणी केली. सदर ठिकाणी नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची उपलब्धता कितपत आहे, याची माहिती त्यांनी घेतली. या भागातील नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान झोन सभापती किशोर जाधव, नगरसेवक अजय जयस्वाल, नजीबखान करीम खान, संदिप कांबळे, नगरसेविका रजनी डोंगरे, गौरी मेघवाणी, नुजहत परवीन शाकीर हुसैन, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता श्रीधर कांबळे, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, उपअभियंता शरद तिनखेडे, हेमंत महाजन, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्हाने, अमरावती शहर समन्वयक श्वेता बोके यांच्यासह स्वास्थ्य निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. आठवडी बाजाराची पाहणी आयुक्तांनी बडनेरा येथील आठवडी बाजार परिसराची पाहणी केली. या ठिकाणी जुन्या शौचालयाच्या जागेवर सुरू असलेल्या नवीन बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, जुन्या इमारतीचे बांधकाम पाडल्यानंतर त्याचा मलबा परिसरात पडून असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच बाजारात येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित राहावा, यासाठी हा बांधकाम मलबा तातडीने उचलून घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *