![]()
आपल्या देशासाठी झेंडा, भारत माता की जय आणि वंदे मातरम् म्हणणे अत्यंत गरजेचे आहे. जे लोक हे म्हणत नाहीत, त्यांचे या देशावर प्रेम नसते. आपल्या देशामध्ये राहून ज्यांना ‘वंदे मातरम्’ म्हणावेसे वाटत नाही, तसेच मदरसांसारख्या ज्या संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हटले जात नाही, त्यांची नोंदणी रद्द केली पाहिजे; या भूमिकेचा मी स्वतः आहे, असे वक्तव्य भाजप नेते, मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित तिरंगा रॅलीदरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तिरंगा रॅलीबाबत बोलताना नीतेश राणे म्हणाले की, जो आपल्या भारत भूमीला आपली मानतो आणि ज्याच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, तो प्रत्येक नागरिक आज आमच्या या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाला आहे. प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल गर्व असणे आणि अभिमान वाटणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये या तिरंगा रॅलीचे आयोजन करत आहोत. या रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला देशाबद्दल अभिमान आहे. देशाबद्दल कडवट राहणे गरजेचे नीतेश राणे म्हणाले की, जी लोकं भारत माता की जय म्हणत नाहीत, त्यांना पाकिस्तानात पाठवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण आपल्या देशाबद्दल कडवट राहणे अत्यंत गरजेचे आहे. आम्ही पहिले देशाचे नागरिक नीतेश राणे म्हणाले की, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नंतर आहोत, पण त्याआधी या देशाचे नागरिक आहोत. हेच सर्वांना सांगण्यासाठी आणि राष्ट्रभावना जागवण्यासाठी या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदूषित पाण्यामुळे दाभोळ खाडीचे नुकसान नीतेश राणे म्हणाले की, लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीमध्ये सातत्याने घडणाऱ्या मासेमारीतील नुकसानाच्या घटनांमुळे मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नासंदर्भात तसेच दाभोळ खाडीच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यासंदर्भात चर्चा केली असून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा… 13 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:कोकण-घाटमाथ्यांवर यलो अलर्ट, चीनच्या ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत श्रावण महिन्याची सुरुवात होत असून, त्यापूर्वीच राज्यात हवामानाचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांमुळे मध्य भारतात हवेचे जोडक्षेत्र निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर दिसून येत असून, हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link