![]()
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचे पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्यात यावे आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मंगळवार, 11 ऑगस्ट रोजी पोलीस बॉईज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन केले. स्थानिक पातळीवर सध्या ‘पोलीस बॉईज असोसिएशन’ विरुद्ध ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके असा थेट संघर्ष पेटला आहे. या संघर्षाची ठिणगी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उंबरठ्यावर पडली. दिपके यांच्या कार्यपद्धतीचा आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी पोलीस बॉईज संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. नेमके प्रकरण काय? छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 ऑगस्ट रोजी अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिस उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप अभिजित दिपके यांनी केला होता. पोलिसांच्या या दंडेलशाहीवर संताप व्यक्त करत, “मी कुणाला भेटायचं, हे पोलिसांनी मला सांगायची गरज नाही. मी कुणाला भेटणार हे केवळ मीच ठरवणार,” असे आक्रमक शब्दांत सुनावत त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला तिथून जाण्यास सांगितले होते. या साऱ्या प्रकारानंतर पोलीस बॉईज संघटना आक्रमक झालीय. प्रतिष्ठा आणि स्वाभिमानाची लढाई अभिजित दिपके यांच्याकडून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. राजकीय हेतूने प्रेरित होऊन दिपके हे पोलिसांच्या मुलांच्या आणि कुटुंबांच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा आक्षेप घेत, जिल्हाधिकार्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले असले, तरी “अभिजित दिपके यांच्या बेजबाबदार भूमिकेला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ,” असा थेट इशारा असोसिएशनने दिला आहे. आता या आंदोलनावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. …तर हा संपूर्ण पोलीस दलाचा अपमान! मूक निदर्शनाचे अस्त्र: प्रशासनाला आधी दिलेल्या निवेदनावर कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने, अखेर आज (११ ऑगस्ट) ‘पोलीस बॉईज असोसिएशन’ने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. मुख्य मागण्या: पोलीस अधिकार्याचा जाहीर अपमान करणार्या अभिजित दिपके यांचे पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्यात यावे आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी. आंदोलनात मोठा सहभाग: पोलीस कुटुंबांच्या आणि दलाच्या स्वाभिमानासाठी या आंदोलनात असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. “अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस अधिकार्याचा सार्वजनिकरीत्या अपमान करणे, हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण पोलीस दलाचा आणि कायद्याच्या राज्याचा अवमान आहे. प्रशासनाने दिपके यांचे पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, हीच आमची ठाम मागणी आहे.” — रवी वैद्य, पदाधिकारी, पोलीस बॉईज संघटना
Source link
पोलीस बॉईज असोसिएशन विरुद्ध अभिजित दिपके!:'कॉकरोच जनता पार्टी'च्या संस्थापकाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन