![]()
छत्रपती शिवरायांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवून अठरापगड जातीच्या घटकांना बरोबर घेऊन आमदार राजेंद्र राऊत यांनी सकल समाजघटकांना न्याय देत केलेले लोकसेवा आणि विकासाचे काम अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काढले. येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार राऊत यांची विधानपरिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आयोजित केलेल्या जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ. बी वाय यादव, अ.भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे, मराठा महासंघ नेते दास शेळके, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मराठा महासंघ नेते सुनील रसाळे, शंभूराजे युवा क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष सुनील मोरे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी के देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, उद्योजक प्रशांत कथले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते आमदार राऊत यांचा सन्मानपत्र व तलवार देऊन बार्शीसारख्या सर्व क्षेत्रात मोठा वारसा लाभलेल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व राजाभाऊंनी समर्थपणे केले आहे. भगवंत तीर्थक्षेत्र विकासासाठी राजाभाऊ तळमळीने प्रयत्न करत आहेत. भगवंत महोत्सवाचे यशस्वीपणे आयोजन करत आहेत. असे कौतुक जयवंत महाराज बोधले यांनी अध्यक्षीय मनोगतात केले. आजपर्यंतच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत समाजाने खंबीर साथ दिली. पुढे दोन वेळा आमदार झालो. सर्वांना बरोबर घेऊन काम केले. मोठी दहशत झुगारली. सर्व समाजाने माझ्यावर जीवापाड प्रेम केले. दोन वेळा पराभव झाला पण डगमगलो नाही. २०२४ साली समाजाचा माझ्याबद्दल गैरसमज झाला. पण २०२४ साली विधानसभेला पराभव झाल्यानंतर तालुक्याचा खुंटलेला विकास आणि अडलेली कामे जनतेने पाहिली. त्यामुळे नंतर सर्व निवडणुकात भरभरून यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला न्याय दिला. आता तालुक्यात आणखी दोन एमआयडीसी होण्यासाठी प्रयत्नशील आहे. बार्शी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील ५० हजार एकर जमीन ओलिताखाली आणणार आहे.असे आ. राऊत म्हणाले. सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा महासंघाच्या माध्यमातून राजाभाऊंनी समाज बांधणीचे काम केले. एसईबीसी प्रमाणपत्र मराठा समाज बांधवांना मिळवून देण्यासाठी कागदपत्रांची शोध मोहीम राबवली. २७ हजार समाज बांधवांना ही प्रमाणपत्रे मिळवून दिली. समाजाबरोबरच सर्व समाज घटकांसाठी राजाभाऊंनी लोकप्रतिनिधी पदाच्या व सत्तेच्या माध्यमातून काम केले. यावेळी आमदार राऊत यांची सपत्नीक वही तुला करण्यात आली. प्रास्ताविक विशाल गरड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुण बारबोले, नितीन देशमुख, कालिदास मुकटे, किरण गाढवे, गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. शेतकऱ्यांचे भविष्य घडवणे हेच ध्येय : राऊत
Source link
शिवचरित्र आदर्श मानून राजाभाऊंनी केलेले कार्य अभिमानास्पद:कर्तृत्व आणि दातृत्व म्हणजेच आमदार राऊत