![]()
छत्रपती संभाजीनगर येथे अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात बुधवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. या महामोर्चात केवळ पुरुषच नव्हे, तर महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात निळे झेंडे, फलक आणि उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीचे बॅनर घेतले होते. ‘जय भीम’च्या घोषणांनी क्रांती चौक परिसर दुमदुमून गेला होता. क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक आणि किल्लेअर्क मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचला. आंदोलकांनी शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला. मोर्चातील प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहता, पोलीस प्रशासनाने सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त तैनात केला होता. प्रमुख मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले होते, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखली जाईल.
Source link
आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरात आज मोर्चा:'जय भीम'च्या घोषणांनी क्रांती चौक दणाणला, हजारो सहभागी