![]()
देशभक्तीची भावना जनमानसात जागृत करण्यासह राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल आदर, अभिमान, आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत बुधवारी १२ ऑगस्टला तिरंगा रॅलीचे आयोजन केले. दुपारी ४ वाजता नेहरू मैदान येथून मान्य
.
रॅलीने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इर्विन चौक मार्गे शहरातून मार्गक्रमण करत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समारोप केला. रॅलीदरम्यान जयस्तंभ चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रॅलीत शहरवासीयांसह मनपाचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, शाळा-महाविद्यालयांती ल विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला. तिरंगा हातात घेऊन देशभक्तीच्या घोषणांनी भारावलेल्या वातावरणात निघालेल्या या रॅलीने शहरात राष्ट्रप्रेमाचा उत्साह निर्माण केला. या वेळी उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा, अवयवदानाची शपथ घेतली. शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. रॅलीच्या समारोपावेळी रंगीबेरंगी तिरंगा फुगे आकाशात सोडले. रॅलीला महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, गटनेते नाना आमले, गटनेते डॉ.राजेंद्र तायडे, गटनेते शेख हमीद शेख वाहेद, झोन सभापती माधुरी ठाकरे, स्वाती कुलकर्णी, इस्माइल कासम लालुवाले, किशोर जाधव, खॉ आसिया अंजुम वहिद, विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला व उपसभापती डॉ.मधुरा कहाळे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील व उपसभापती सुमती ढोके, माध्यमिक पुर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापती अॅड.प्रिती हर्षल रेवणे व उपसभापती वंदना मडघे, महिला व बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे व उपसभापती लता देशमुख, नगरसेवक, नगरसेविका, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, महापालिका व पोलिस विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी सहभागी नागरिक, शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ही रॅली यशस्वी करण्यासाठी बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, बाजार व परवाना विभाग व अग्निशमन विभाग यांचे विशेष योगदान लाभले. या सर्वांनी रॅलीच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत अपार मेहनत घेतली.
महापौर श्रीचंद तेजवानी यांनी अमरावतीकरांना ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर, अभिमान आणि देशप्रेमाची भावना व्यक्त करावी, असे त्यांनी सांगितले. या वेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी उपस्थितांना संबोधित करताना ‘हर घर तिरंगा’ ही केवळ मोहीम नसून, राष्ट्रध्वजाशी असलेले प्रेम, निष्ठा आणि अभिमान व्यक्त करण्याची संधी असल्याचे सांगितले.