Headlines

पालखी सोहळ्याने अक्कलकोट नगरी दुमदुमली:धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, अक्कलकोटच्या राजेराय मठात स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव थाटात‎



श्री स्वामी समर्थ सद्गुरु बेलानाथ महाराजांच्या राजेराय मठ येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४८ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पंधरा दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल ह

.

पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी, १५ एप्रिल रोजी पहाटे दोन वाजता काकड आरती व महापूजा करण्यात आली. सकाळी १० ते १२ या वेळेत स्थानिक व बाहेरगावच्या भक्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकांवर सामुदायिक अभिषेक पार पडला. दुपारी महाआरती व महानैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या धर्मसंकीर्तन सोहळ्यात भजन, कीर्तन, प्रवचन तसेच भरतनाट्यम आणि कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. १६ एप्रिल रोजी बेला समर्थ महिला मंडळाच्या उपस्थितीत गोपाळकाल्याने या पंधरा दिवसांच्या उत्सवाची सांगता झाली. या महोत्सवासाठी मठाचे अध्यक्ष ॲड. शरद फुटाणे, उपाध्यक्ष विकास दोडके, पुण्यतिथीनिमित्त पनवेलचे अनुराग घरत, कोल्हापूरचे विराज धोंगडे आणि पुण्याचे विशाल धुमाळ यांनी मंदिरात व गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास केली होती. सोलापूरच्या वज्रेश्वरीताई गाजूल यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम महिला मंडळाने महाप्रसाद वितरण व स्वच्छतेची सेवा बजावली. तसेच ज्योती झिप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ९५ महिलांनी गुरुलीलामृत पोथीचे पारायण केले. या महिला मंडळाने मठाला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या ७५ प्रति आणि एक हार्मोनियम भेट स्वरूपात दिले. सायंकाळी ६ वाजता राजेराय मठातून भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या पालखीमध्ये नाशिककर महाराज दिंडी, हसापूरचे जय हनुमान भजनी मंडळ, चाकणचे मोरया ढोल पथक, अक्कलकोटचे दावल व दरबार बँड, हालहळीचे सनई-हलगी पथक आणि तुतारीच्या निनादाने वातावरण भारावून गेले होते. मुंबईचे नाट्यकर्मी मयूर मुरलीधर यांनी सादर केलेला श्रींचा जिवंत देखावा आकर्षणाचे केंद्र ठरला. पालखी मार्गावर महिलांनी पंचारतीने ओवाळून व प्रसाद वाटप करून दर्शन घेतले. दोडके, सचिव प्रा. किसन झिपरे, विश्वस्त ॲड. अनिल मंगरूळे, दत्तात्रय मोरे, विजयकुमार गाजूल, पद्माकर डीगे, सुरेश डिगे, शिवानंद फुलारी, महेश कलशेट्टी, वैशाख डिगे, ओंकार दोडके, ॲड. श्रद्धांक झिपरे यांच्यासह मठाचे सेवेकरी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

वाद्यांच्या गजरात निघाली भव्य पालखी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *