![]()
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक, नागरी संरक्षण व सुधारात्मक सेवांमधील १०५७ जवानांसाठी शौर्य व सेवा पदकांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या एकूण ८२ पदकांमध्ये ३३ शौर्य पदके (जीएम), ५ राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके (पीएसएम) व ४४ गुणवत्तापूर्ण सेवा पदके (एमएसएम) यांचा समावेश आहे. राज्यातील २० पोलिस जवानांना शौर्य पदकाने गौरवण्यात आले आहे. तर मुंबईत ऑगस्ट २०२५ मधील दुर्घटनेत हवेत ५० फूटावर अडकलेल्या मोनोरेल मधील ५८२ प्रवाशांना वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या १३ जवानांनाही शौर्य पदक जाहीर झाले. नक्षलग्रस्त मोहिमेसाठी सर्वाधिक १९७ पदके, २० पोलिसांना पदक देशभरात जाहीर ३०१ शौर्य पदकांपैकी सर्वाधिक १९७ पदके नक्षलग्रस्त भागात तैनात जवानांना मिळाली. महाराष्ट्रातील सर्व २० पोलिस शौर्य पदके गडचिरोली व नक्षलविरोधी मोहिमेत कामगिरी करणाऱ्या जवानांना मिळाली आहेत.
Source link
महाराष्ट्राच्या शौर्याचा सन्मान…:पोलिस, अग्निशमन दलाला 82 पदके जाहीर, पाच पोलिस अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाने गौरव